EVM मशीन हॅक होऊ शकते, असे विधान टेस्लाचा सीईओ एलॉन मस्क याने केले होते. त्यावरुन भारतात काहूर उठले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडच्या प्राथमिक फेरीत एका ठिकाणच्या मतदानात ईव्हीएममुळे गडबड झाल्याचे समोर आले. अणेरिकेतील हा अनुभव मस्क याने सोशल मीडिया एक्सवर शेअर केला आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंक मशीन बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर भारतात याच मुद्यावरुन राजकारण पेटले आहे.
काय म्हणाला होता मस्क
एलॉन मस्क याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी यांच्या युनियर ही पोस्ट शेअर केली आहे. सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याने ईव्हीएम विषयी भावना व्यक्त केल्या आहेत. “इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नष्ट करायला हव्यात. या मशीन मानव आणि AI च्या मदतीने हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड उडते.”, असे मत त्याने पोस्टमध्ये व्यक्त केले होते.
आता वाकयुद्ध
ईव्हीएमचा हा मुद्दा ताजा असतानाच राहुल गांधी यांनी याविषयीचे ट्वीट केले. विरोधकांनी या मुद्याला हवा दिली. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क याच्या ट्वीटला उत्तर दिले. त्यावरून वाकयुद्ध सुरु झाले. मस्क याच्या विधानात काहीच अर्थ नाही. काहीच तथ्य नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. त्यांनी भारताकडून काही तर शिकावं असा टोला चंद्रशेखर यांनी लगावला.
भारतात EVM एक ब्लॅक बॉक्स – राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी EVM वर पुन्हा प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविषयीची पहिली प्रतिक्रिया दिली. भारतात ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असल्याचे ते म्हणाले. ईव्हीएमच्या तपासणीची गरज नाही. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेविषयी चिंता व्यक्त होत आहे. जेव्हा लोकशाही प्रक्रियेत संस्थांचे उत्तरदायीत्व कमी होते, तेव्हा लोकशाहीचे ढोंग करण्यात येते. अशावेळी फसवणुकीची भीती अधिक असते.