नवी दिल्ली : एका Youtube व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की, मोदी सरकारकडून मोदी लोन योजनेअंतर्गत देशवासियांच्या खात्यात 75 हजार रुपये जमा केले जात आहेत. पण अशी कुठलीही योजना नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कारण, केंद्र सरकार अशी कुठलीही योजना सुरु नाही. मोदी सरकारच्या लोन योजनेनुसार सर्व देशवासियांना 75 हजार रुपये वाटले जात आहेत. यासाठी तातडीने अर्ज करा, असं आवाहनही करण्यात येत आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो अर्थात PIB ने फॅक्ट चेकने या दावाची पडताळणी केली असता, हा दावा साफ खोटा असल्याचं समोर आलं आहे.(Fackt Check of modi government offering Modi loan scheme)
केंद्र सरकारने अशा कुठल्याही योजनेची घोषणा केलेली नाही. हा व्हिडीओ खोटा आहे. अशा प्रकारची कुठलीही योजना सरकारकडून सुरु नसल्याचं PIB फॅक्ट चेकने स्पष्ट केलं आहे.
दावा: एक #YouTube वीडियो में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार द्वारा मोदी लोन योजना के तहत सभी देशवासियों के खाते में ₹75,000 की नगद राशि दी जा रही है। #PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। केंद्र सरकार ने ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/2UiDtjwcAI
— PIB Fact Check (@PIBFactCheck) February 2, 2021
या योजनेची माहिती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सरकारकडून रोख रक्कम दिली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हिडीओनुसार देशातील नागरिकांना लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने मोदी लोन योजना सुरु केली आहे. मात्र, अशाप्रकारची कुठलीही योजना केंद्र सरकारकडून सुरु नाही. या योजनेबाबत खोटी माहिती सध्या पसरवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 ला प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत लोकांना व्यवसाय, व्यापार सुरु करण्यासाठी कर्ज दिलं जातं. यातील खास बाब म्हणजे या कर्जासाठी कुठल्याही प्रकारच्या गॅरंटीची गरज नाही. बेरोजगारांना आपल्या पायांवर उभं करण्यासाठी आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेतून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. या योजनेनुसार 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.
जर तुम्हाला नवा उद्योग सुरु करायचा असेल किंवा आपल्या उद्योग नव्याने स्थापित करु इच्छित असाल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. या योजनेनुसार व्यापार, विक्रेता, दुकानदार, छोटे उद्योगपती, निर्माता, कृषी क्षेत्राशी निगडीत असलेले लोक कर्ज घेऊ शकतात.
संबंधित बातम्या :
Fackt Check of modi government offering Modi loan scheme