Fact Check : आगामी 10 दिवस खरंच विध्वंसक असणार ? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय ?

| Updated on: May 01, 2021 | 11:54 PM

भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असून कम्यूनिटी ट्रान्समिशन सुरु झाल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. (fact check coronavirus community transmission)

Fact Check : आगामी 10 दिवस खरंच विध्वंसक असणार ? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय ?
Coronavirus-Community-Transmission
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर भारतामध्ये कोरोनाची (Corona virus) तिसरी लाट आली असून कम्यूनिटी ट्रान्समिशन सुरु झाल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. (fact check of Corona virus community transmission viral message on Social Media)

व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये काय आहे ?

फेसबुक तसेच व्हॉट्सअ‌ॅपवर सध्या एक मेसेज जोरात फिरतो आहे. यामध्ये देशात कम्यूनिटी ट्रान्समिशन सुरु होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच देशात कोरोनाची तिसरी लाट अल्याचेसुद्धा सांगितले जात आहे. देशातील टास्क फोर्सने ही माहिती दिल्याचा दावा केला जातोय. त्याबरोबरच पुढील 10 दिवस हे कठीण असून काळजी घेण्याचं आवाहन या मेसेजमध्ये करण्यात येत आहे.

हा मेसेज खरा आहे का ?

देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचा मेसेज समाजमाध्यमांमध्ये फिरत असल्यामुळे अनेकजण भयभीत झाले आहेत. अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. मात्र, या मेसेजच्या सत्यतेबद्दल सरकारी न्यूज एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने अधिक सांगितलं आहे. पीआईबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कम्यूनिटी ट्रान्समिशन सुरु झाल्याचा मेसेज खोटा आहे. हा मेसेज जुना असून हे विधान अज्ञातांनी मागील वर्षी केले होते. तसेच मागील वर्षी केलेले हे विधान चुकीचं आणि खोटं असल्याचं पीआयबीने सांगितलं आहे.


कम्यूनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय ?

देशात सध्या कम्यूनिटी ट्रान्समिशन सुरु झाल्याचा खोटा मेसेज व्हायरल झाल्यानंतर कम्यूनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय हे विचारले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाचा संसर्ग होते. हा संसर्ग नेमका कसा झाला हे सांगणे अवघड होऊन जाते, तेव्हा कम्यूनिटी ट्रान्समिशन सुरु झाले, असे म्हटले जाते.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेजेस पसरवले जात आहे. त्यांच्या सत्यतेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे कोणत्याही मेसेजवर थेट विश्वास ठेवण्याअगोदर त्याची सत्यता पडताळावी असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Delhi Lockdown | दिल्लीमध्ये आणखी एका आठवड्यासाठी लॉकाडाऊन वाढवला, वाढत्या कोरोनामुळे निर्णय

Maharashtra Coronavirus LIVE Update : ऑक्सिजन ट्रेन गोंदिया जिल्ह्यात दाखल

मोठी बातमी! WHO कडून मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता

(fact check of Corona virus community transmission viral message on Social Media)