Farmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात

| Updated on: Jan 26, 2021 | 4:10 PM

उत्तर प्रदेशमध्ये आज महिल्यांच्या गुलाबी गँगकडून ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Farmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी गुलाबी गँग मैदानात
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी थेट लाल किल्ल्यावर चढाई केल्याचं चित्रही दिसून येत आहे. अशा स्थितीत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशात गुलाबी गँग मैदानात उतरली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज महिल्यांच्या गुलाबी गँगकडून ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं असता गुलाबी गँगच्या सदस्य आणि पोलिसांमध्ये काही बाचाबाची झाल्याचंही दिसून आलं.(Gulabi gang of women in Uttar Pradesh to support the farmers’ movement in Delhi)

दरम्यान, आजच्या ट्रॅक्टर रॅलीसाठी उत्तर प्रदेशातूनही हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार होते. पण उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये डिझेल न भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातून आज फार कमी ट्रॅक्टर दिल्लीतील आंदोलनात सहभागी होऊ शकले. पण स्थानिक शेतकऱ्यांनी आणि गुलाबी गँगने मात्र दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आपल्या क्षेत्रातच रॅली काढली.

दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद

दिल्लीतील शेतकरी आंदोलन अधिक हिंसक बनल्यानं दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे मोबाईल, व्हॉट्सअॅपद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश येईल आणि आंदोलन शांत करण्यास मदत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आंदोलनाला हिंसक वळण कशामुळे?

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दुपारी 12 वाजेची वेळ दिली होती. पण संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांचं न ऐकता शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. तसेच शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. मात्र, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याचवेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यास सुरुवात केली.

रस्ते ब्लॉक, मेट्रो बंद

शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांनी जीटी करनाल रोड, आऊटरिंग रोड, बादली रोड मधुबन चौक, नरेला रोड आदी मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली असून या मार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसेच वजीराबाद रोड, आयएसबीटी रोड, पुश्ता रोड, विकास मार्ग, एनएच-24 रोड आणि नोएडा लिंक रोडवरही वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. दुसरीकडे दिल्लीतील मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशनचे सर्व एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे बादली, रोहिणी सेक्टर 18-19, हैदरपूर बादली मोड, जहांगीरपुरी, आदर्श नगर, आझादपूर, मॉडल टाउन, जीटीबी नगर, विद्यापीठ, विधानसभा आणि सिविल लाइन्समधील मेट्रोचे गेट बंद करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Delhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या

ठरलेल्या मार्गावरुन भ्रम, हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, शेतकऱ्यांचा सरकारवर गंभीर आरोप

Gulabi gang of women in Uttar Pradesh to support the farmers’ movement in Delhi