नवी दिल्लीः दिल्लीतील जंतर-मंतरवर (Delhi Jantar Mantar) आज संयुक्त किसान मोर्चाकडून किसान महापंचायतीची (Kisan Morcha Mahapanchayat ) घोषणा करण्यात आली आहे. महापंचायतीत सहभागी होण्यासाठी विविध राज्यातील शेतकऱ्यांची अनेक तुकड्या आता दिल्लीत पोहचत आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांचा ओघ वाढला असला तरी, दिल्ली पोलिसांकडून मात्र या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर (Delhi Border) प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमा आणि गाझीपूर सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याचवेळी, नवी दिल्लीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महापंचायतीसाठी परवानगी मागण्यात आली होती, मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आम्ही या आंदोलनाला परवानगरी नाकारली आहे.
Delhi | Farmers begin arriving at Jantar Mantar to stage a protest against unemployment, amid heavy police and security presence
Police have heightened security at the three border entry points to Delhi at Ghazipur, Singhu and Tikri pic.twitter.com/cjzH2xGccE
— ANI (@ANI) August 22, 2022
यामुळे नवी दिल्लीतील सर्व भागात कलम 144 कलम लागू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या राकेश टिकैत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने महापंचायतमधील शेतकऱ्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितल की, संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या महापंचायतीसंदर्भात टिकरी सीमेवर तसेच या परिसरातील सर्व सीमावर्ती भागात पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापंचायतीसाठी आलेले शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, आणि त्यांना दिल्लीतील मधू विहार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
जंतर-मंतरवर चालणारी किसान महापंचायत दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर युनायटेड किसान मोर्चाच्या बॅनरखाली शेतकरी नेत्यांनी आपल्या मागण्यांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्याची योजना तयारी केली आहे. सरकारने कोणत्याही प्रकारचा गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असंही संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
लखीमपूर खेरी घटनेतील पीडित शेतकरी कुटुंबांना न्याय मिळावा आणि तुरुंगात असलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे. लखीमपूर खेरी घटनेप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना अटक करण्याची करण्याची मागणी स्वामिनाथन आयोगाच्या C2+50 टक्के फॉर्म्युल्यानुसार, MSP ची हमी देणारा कायद्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
वीजबिलाबाबत 2022 ची नियमावली रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. उसाची आधारभूत किंमत वाढवून उसाची थकबाकी त्वरित देण्यात यावी, तसेच भारताने WTO मधून बाहेर पडावे आणि सर्व मुक्त व्यापार करार रद्द करण्याची मागणीही केली गेली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. पंतप्रधान फसल विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांची थकीत नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी आणि सैन्यात भरतीची अग्निपथ योजना मागे घेण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.