नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातला भेट दिली. जिथे त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत आले होते. त्यांनी पंतप्रधान जॉन्सन यांचे भव्य आणि जंग्गी स्वागत केले होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर शुक्रवारी दिल्लीत दोन्ही देशांच्या संरक्षण, व्यापार आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच जॉन्सन यांनी गुजरातमध्ये झालेल्या भव्य स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि त्यांचे “खास मित्र” असे वर्णन केले. तसेच पंतप्रधान मोदींना आपला खास मित्र म्हणून संबोधित करताना ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेचे भव्य स्वागत केल्याबद्दल आभार मानतो. माझ्या आगमनानंतर ज्या प्रकारे माझे स्वागत करण्यात आले, मी स्वतःला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) समजतो.
मोदींचे जोरदार कौतुक
पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्या भारत भेटीबाबत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेची पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार कौतुक केले. गुजरातमध्ये आपल्या स्वागताने तसेच अहमदाबादमधील रस्त्यांवर लावलेल्या पोस्टर्सने मी भारावून गेलो होतो असे ते म्हणाले. तसेच आपल्याला खूप आनंद झाल्याचेही पंतप्रधान जॉन्सन यांनी सांगितले. त्याचबरोबर जणू मी सचिन आणि अमिताभ असल्याचेच वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्या भारत भेटीत शुक्रवारी, यूके आणि भारताच्या धोरणात्मक बाबींवर चर्चा केली. यावेळी त्यांनी संरक्षण, राजनैतिक आणि आर्थिक भागीदारीवर सखोल चर्चा केली. ज्याचा उद्देश इंडो-पॅसिफिकमध्ये जवळची भागीदारी आणि सुरक्षा सहकार्य वाढवणे आहे.
UK PM lauds ‘khaas dost Modi’ for amazing India welcome, says felt like Sachin Tendulkar, Amitabh Bachchan
Read @ANI Story | https://t.co/sikGY17WP3#PMModi #BorrisJohnson #UKIndia #SachinTendulkar #AmitabhBachchan pic.twitter.com/S4k4bqwkf7— ANI Digital (@ani_digital) April 22, 2022
यावेळी ते म्हणाले, गुजरातच्या लोकांनी आमचे अप्रतिम स्वागत केले. ते अगदी विलक्षण होते. इतके जंग्गी स्वागत मी कधीही पाहिले नाही. माझं असं स्वागत जगात इतरत्र कुठेही झालेली नाही. पहिल्यांदाच असं स्वागत पाहणं आश्चर्यकारक होतं. तत्पूर्वी, पंतप्रधान जॉन्सन यांनी राजघाटावर पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली होती.
#WATCH| On being asked about Nirav Modi, Vijay Mallya &Khalistani extremists,British PM Boris Johnson said,”We’ve set up an anti-extremist task force to help India…UK govt ordered extradition…We don’t welcome people who want to use our legal system to evade the law in India.” pic.twitter.com/rK3nV9xRG2
— ANI (@ANI) April 22, 2022