दिवसा महिला बस कंडक्टर, रात्री गोरगरीबांच्या मुलांसाठी शिक्षक, १२०० मुलांना शिकवलं पण अखेर..

| Updated on: Nov 08, 2022 | 7:55 PM

श्यामलाचा संपूर्ण संघर्ष नीट वाचा. तुम्हाला निश्चित प्रेरणा मिळेल, श्यामलाने शिक्षणाचं काम केलं, तरी देखील तिच्या नशीबी कॅन्सर आला, श्यामलाला

दिवसा महिला बस कंडक्टर, रात्री गोरगरीबांच्या मुलांसाठी शिक्षक, १२०० मुलांना शिकवलं पण अखेर..
Follow us on

तिरुपती : श्यामला या महिला बस कंडक्टर आहेत, त्या दिवसा बस कंडक्टरचं काम करतात, यावरच त्यांचा दिवसपूर्ण होत नाही, त्या रात्री मुलांना शिक्षण देतात. पण खरी कहाणी आणखी पुढे आहे, श्यामलाच्या जीवनात जे झालं, ते इतर कुणासोबत झालं असतं, तर त्याने शिकवण सोडलं असतं. श्यामला देखील यापूर्वी असाक्षरांच्या रांगेत होती, तिने शिक्षणाचा प्रभाव पाहिला आणि आता असं कुणीही राहू नये, यासाठी तिने काम केलं, पण श्यामलाला यापेक्षाही जास्त संघर्षाचा सामना करावा लागला. गरीब, भिकारी, कचरा वेचणारे, रस्त्यावरचे फेरीवाले यांच्या मुलांच्या जीवनात तिने शिक्षणाची ज्योत पेटवली आहे.

श्यामलाचं काम इथंच संपलेलं नाही, श्यामलाचा संपूर्ण संघर्ष नीट वाचा. तुम्हाला निश्चित प्रेरणा मिळेल, श्यामलाने शिक्षणाचं काम केलं, तरी देखील तिच्या नशीबी कॅन्सर आला, श्यामलाला ब्रेस्ट कॅन्सर झाला, यावर श्यामलाने उपचार घेतले, पण शिक्षणाचे उपचार थांबवले नाहीत, शाळा थांबवली नाही, मुलांना शिकवत राहिली.

श्यामलासह तिच्या आईवडिलांना ५ मुली होत्या, परिस्थितीमुळे ती शिकू शकली नाही, तिचं लग्न एका मेंढपाळाशी झालं. पण त्या मेंढपाळाने तिला शिकवलं. श्यामलाला शिकण्यासाठी प्रेरणा दिली. श्यामलाला कंडक्टरची नोकरी मिळाली, अर्थातच आपण म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली. श्यामला या प्रगतीवर अजिबात थांबली नाही, तिने ठरवलं इतरांची प्रगती कधी होणार.यासाठी तिने ज्या मुलांना शिक्षण घेणे शक्य नाही, त्यांना मोफत शिक्षण देणं सुरु ठेवलं.

श्यामलाने सुरुवातीला ५० मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.पण श्यामलाला आणखी एक अडचण जाणवली या मुलांना पोटभर खायला नसतं. पोटात भूख मावत नसताना, मुलं शिकणार तरी कशी. म्हणून श्यामला आपला अर्धा पगार खर्च करत होती, पण मदतीला आणखी हात पुढे आले. मुलांची संख्या वाढत गेली आणि एक इमारत भाड्याने घ्यावी लागली.

श्यामलाच्या मदतीला सर्वसामान्य माणसं पुढे आली, कुणी रेशनिंगच्या तांदुळातील वाटा दिला, कुणी भाजीविक्रेत्यांनी भाजीपाला मोफत दिला.तिने ५० मुलांना प्राथमिक शिक्षण देऊन पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत दाखल केलं, आतापर्य़ंत तिने १२०० मुलांना प्राथमिक शिक्षण दिलं आहे.

पण सर्वकाही सुरळीत असताना श्यामलाला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समोर आलं.पण तिची याबाबत कोणतीही किरकिर नाही, ती म्हणते उपचार सुरु आहेत. माझ्यासाठी यापेक्षाही कोविड काळ वाईट होता, कारण मुलांना खायलाच नव्हतं, अनेकांना त्यांच्या गावी पाठवण्यात आलं, पण अनाथ मुलांचं काय? करायचं हा प्रश्न काही सुटत नव्हता.

तो तणाव खूप जास्त होता. तो देखील प्रश्न सुटला पण आजापपण आलंय, माझे त्यावर उपचार सुरु असल्याचं ते सांगतात.तिरुपती जिल्ह्यातील नायडूपेट तालुक्यातील तरुमंची कंड्रिगा हे श्यामला यांचं मूळ ठिकाण आहे.