सिव्हील सेवेच्या इतिहासातील अजब प्रकरण घडले आहे. एका महिला आयआरएस अधिकाऱ्याला मंगळवारपासून आता पुरुष अधिकारी मानले जाणार आहे. केंद्रीय उत्पादन तसेच सीमा शुल्क बोर्ड, महसूल विभागाने मंगळवारी या निर्णयाला मंजूरी दिली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याचे नाव मिस एम.अनुसूया ऐवजी आता एम. अनुकथिर सूर्या असे असणार आहे आणि त्यांची ओळख आता महीलाच्या ऐवजी पुरुष अधिकार म्हणून होणार आहे.
महिला आरआरएस अधिकारी एम. अनुसुया हैदराबादच्या क्षेत्रीय सेंट्रल एक्साइज कस्टम एक्साईज आणि सर्व्हीस टॅक्स अपिलीय न्यायाधिकरण ( CESTAT ) मध्ये जॉईंट कमिशनर म्हणून तैनात होत्या. मिस अनुसूया यांनी त्यांचे नाव एम. अनुकथिर सूर्या आणि लिंग महिले ऐवजी पुरुष करण्याची विनंती केली होती. विभागाने त्यांची ही विनंती मान्य केली आहे. आता त्या पुरुष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार आहेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड, राजस्व विभागाने हा आदेश जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की एम.अनुसुया यांच्या विनंतीवर विचार केला गेला आहे. आता अधिकाऱ्याच्या सर्व रेकॉर्डवर अधिकृतरित्या मिस्टर एम. अनुकाथिर सूर्या असा बदल केला जाणार आहे.
एम. अनुकाथिर सूर्या यांनी मद्रास इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रॉनिक्स आणि संचारमध्ये स्नातकची डिग्री घेतली आहे.त्यांनी साल 2023 मध्ये भोपाळमध्ये नॅशनल लॉ इन्स्टीट्यूट युनिव्हर्सिटीमधून सायबर लॉ आणि सायबर फोरेन्सिक मध्ये पीजी डिप्लोमा देखील केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 15 एप्रिल 2014 रोजी भारताने तृतीय लिंगाला परवानगी दिली आहे.लिंग ओळख एक व्यक्तिगत निर्णय आहे. मग कोणी सर्जरी केलेली असो वा नाही.ओदिशात एका पुरुष कमर्शियल टॅक्स ऑफीसरने ओदिशा फायनान्सियल सर्व्हीसमध्ये नोकरी जॉईंट केल्यानंतर पाच वर्षांनंतर 2015 मध्ये आपले लिंग परिवर्तन करुन महिला अधिकारी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारने मंजूरी दिली होती.