नवी दिल्ली : अखेर प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. महाकालचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी इंदूरमध्ये भाषण देखील केले आहे. यावेळी त्यांनी आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे की आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहोत. प्रियंका गांधी या देशाचे भविष्य आहेत. आपण प्रियंका गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या बाबत बोलताना प्रियंका गांधी यांनी सांगितले की, रॉबर्ट वाड्रा हे राजकारणात प्रवेश करणार असून, ते काँग्रेससाठी (Congress) काम करतील.
प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असून, प्रियकां गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रियंका या देशाचे भवितव्य आहेत. आपण इथूनपुढे त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे वाड्रा यांनी म्हटले आहे. ते इंदुरमध्ये एका भाषणात बोलत होते.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंड पहावे लागत आहे. नुकत्याच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकला लागला या पाचही राज्यात काँग्रेसचा सपाटून पराभव झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र ती सत्ता टिकवण्यात देखील काँग्रेसला अपयश आले. पंजाबमध्ये पक्षाला अवघ्या आठरा जागांवर समाधान मानावे लागते. त्यामुळे आता पक्षांतर्गत हालचालींना जोरदार सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची चिंतन बैठक देखील पार पडली होती. आता रॉबर्ट वाड्रा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वाड्रा यांच्यावर पक्षातील एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
सोमय्यांसोबत खडसेंचं ये दोस्ती नहीं तोडेंगे, तर फडणवीसांना दुश्मन न करे तुने ऐसा काम किया रे…
पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं! यशोमती ठाकूरांचं मोठं विधान