मध्यप्रदेश | आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजू हीच्या कुटुंबियांची डोकेदुखी ही दिवसेंदिवस दुप्पटीने वाढतेय. अंजूच्या आई-वडिलांना आता गावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंजूमुळे आम्हा गावकऱ्यांनी नाहक बदनामी होतेय. “आम्हाला अंजूमुळे विनाकारण संताप सहन करावा लागतोय. त्यामुळे आम्ही अंजूचे वडील गया प्रसाद थॉमस यांना गावाबाहेर कुठेही जायला सांगतोय,” असं गावकऱ्यांचं म्हणनं आहे.
अंजू आपल्या नवऱ्या आणि मुलांना सोडून कथित प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली आहे. अंजूचे पाकिस्तानमधील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंजूने नसरुल्लाह याच्यासोबत लग्न केलंय, असंही म्हटलं जात आहे. मात्र अद्याप अंजू किंवा तिच्या कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणात गृहमंत्री नरोत्त्म मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
“जर असंच झालं तर अंजूच्या वडिलांसह कुटुंबियांनाही गावातून बाहेर काढू. केंद्र सरकारचं या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष आहे. मात्र सरकारला इथे आम्ही मध्यस्थी करुन देणार नाही. विरोध करण्याची गरज नाही. कारण आमचं गाव एक समूह आहे. चर्चेचा संबंधच येत नाही. आमचं गाव कसं आहे ते अंजूला माहिती आहे. अंजूला येथे येऊन दिलं जाणार नाही”, असं उत्तर गावकऱ्यांनी जर अंजू कुटुंबियांना भेटायला आली तर तुम्ही तिला भेटायला द्याल का? या प्रश्नावर दिलं
अंजूमुळे तिचे वडील गया प्रसाद यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र मी चौकशीसाठी सज्ज आहे, अशी तयारी गया प्रसाद यांनी दाखवली आहे. “चौकशीसाठी यावं, आमची चौकशी करावी. आम्हाला काहीच हरकत नाही. आमच्याकडे काहीच संश्यास्पद नाही. तसेच माझ्यावर संशय येईल असा माझा स्वभाव किंवा वागणूकही नाही. मी सर्वसामन्य माणूस आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोरा जाण्यासाठी तयार आहे. हे माझ्या कर्माचे भोग आहेत, ज्यामुळे मला हा त्रास सहन करावा लागतोय. माझ्या मनाला काय यातना होतायेत, हे कुणीच समजू शकत नाही”, अशा शब्दात गया प्रसाद यांनी खंत व्यक्त केली.
“अंजूमुळे आम्हा सर्व कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतोय. माझ्या मुलाची नोकरी गेली. आमचं कुटुंब उद्धस्त झालंय. अशा जगण्याला काहीच अर्थ नाही, आम्हाला मृत्यू यावा, अशी विनंती आम्ही देवाकडे करतोय. कारण असं त्रासदायक पद्धतीने आम्ही जगू शकत नाही”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया गया प्रसाद यांनी दिली.