मुंबई – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी संध्याकाळी उशिरा डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये (JNU Student) हिंसक संघर्ष झाला. त्यामध्ये 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रामनवमी आणि नॉनव्हेज खाण्यावरून गदारोळ झाला आहे. त्यानंतर कावेरी हॉस्टेलच्या (Kaveri Hostel) मेसमध्ये हाणामारी झाली. काही वेळात अखिल भारतीय छात्र परिषदेचे (ABVP) विद्यार्थी पत्रकार परिषद घेणार आहेत. झालेल्या घडामोडीबाबत ते आपली बाजू मांडणार आहेत. याशिवाय डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी संघटना दुपारी दोन वाजता दिल्ली पोलीस मुख्यालयाचा घेराव घालणार आहेत.
We received a complaint from a group of students who are members of JNUSU, SFI, DSF & AISA early this morning against unknown ABVP students. Accordingly, we lodged an FIR under Sec -323/341/509/506/34 IPC. Further probe is on to collect evidence & identify culprits: Delhi Police https://t.co/SDXpCwN6VW
— ANI (@ANI) April 11, 2022
दिल्ली पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून JNU विद्यार्थी संघटना, SFI, DSF आणि AISA यांच्यातील हिंसक संघर्षाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कलम 323/341/509/506/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणते विद्यार्थी दुखावले आहेत. त्याचा तपशील आता गोळा केला जात आहे.