अमेठी | 6 फेब्रुवारी 2024 : गावात एक जोगी आला. गावात पाऊल टाकण्यापूर्वी त्या जोगीने गावाला प्रदक्षिणा घातली. हातातली सारंगी वाजवत, गाणी गात त्याने गावात पाऊल टाकलं. तो एका घराजवळ उभा राहिला, भिक्षा मागू लागला. सारंगी वाजवताना ती काही गाणी गट होत. पण, त्याची गाणी ऐकून त्या घरातील, गावातील सगळेच जण दुखात बुडाले होते. सारंगी वाजवत तो योगी भर्तरी राजाचा त्याग आणि योग-भोग द्वैताची कथा सांगत होता. संपूर्ण गाव त्या जोगीला समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण, तो ठाम होता. अखेर, तो ऐकत नसल्याचे पाहून गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. कोण होता तो योगी?
अमेठी येथील जैस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे खरौली गाव आहे. या गावात रहाणारा रतिपाल सिंग याच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना पिंकू नावाचा लहान मुलगा होता. त्या लहान मुलासाठी रतिपाल यांनी भानुमती हिच्यासोबत दुसरे लग्न केले. लग्न झाल्यानंतर हे जोडपे दिल्लीत रहायला गेले.
2002 मध्ये दिल्लीतील घरातून पिंकू अचानक बेपत्ता झाला. पण तो बेपत्ता होण्यापूर्वी रतिपाल याने त्याला संगमरवरी खेळण्यावरून मारहाण केली होती. आई भानुमती हिच्या सांगण्यावरूनच रातीपला याने ही मारहाण केली होती. त्यामुळे दुखावलेल्या पिंकूने घर सोडले. त्यावेळी पिंकू याचे वय अवघे 11 वर्ष इतके होते.
रतिपाल सिंग याने पिंकूचा शोध घेतला. मात्र, त्याच्या हाती निराशा आली. इकडे घरातून निघालेला पिंकूला दिल्लीत एक साधू भेटला. त्या साधूने त्याला दीक्षा दिली आणि हाच पिंकू योगी म्हणून त्या गावात आला होता. 22 जानेवारीला अयोध्या येथील रामललाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते अयोध्येत आले होते.
अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेऊन ते योगी आपल्या गावी आले. तब्बल 22 वर्षांनंतर पिंकू जोगीच्या वेशात भिक्षा मागण्यासाठी गावी आला तेव्हा कुटुंबीयांना धक्का बसला. पिंकू हिच्या काकीने त्याच्या शरीरावरील जखमांच्या खुणांवरून त्याला ओळखले. तिने लागलीच दिल्लीत राहणारे पिंकुचे वडील आणि सावत्र आईला फोन करून बोलावून घेतले.
पिंकू यांच्या कुटुंबीयांनी त्याला भिक्ष मागण्यापासून रोखले. त्याला थांबायला सांगत होते. आईकडून भिक्षा मिळाल्याशिवाय आपले काम अपूर्ण आहे असे तो सतत सांगू लागला. त्याची ती आर्त साद ऐकून कुटुंबियांना रडू कोसळले. तर तब्बल 22 वर्षानंतर त्या बाप लेकाची भेट ही गावकऱ्यानी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, तो जोगी आपल्या निश्चयावर ठाम होता. अखेर आपल्या आईकडून भिक्षा घेऊनच तो परत निघाला तेव्हा गावकऱ्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.