देशात सापडला पहिला संशयित एमपॉक्स रुग्ण ,हॉस्पिटलात रुग्णाला आयसोलेट केले

| Updated on: Sep 08, 2024 | 10:36 PM

एमपॉक्स म्हणजे मंकी पॉक्स या आजाराने आफ्रीकी देशात खळबळ माजविली असताना आता मंकी पॉक्सचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे.

देशात सापडला पहिला संशयित एमपॉक्स रुग्ण ,हॉस्पिटलात रुग्णाला आयसोलेट केले
Monkeypox
Follow us on

देशात मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. रुग्ण एक युवक आहे, त्याने मंकीपॉक्स म्हणजे ( एमपॉक्स ) पसरलेल्या देशातून प्रवास केलेला आहे. या तरुणाला रुग्णालयात भरती केले आहे. तेथे त्या आयसोलेट करुन स्वतंत्रपणे ठेवले आहे. डब्ल्यूएचओने एमपॉक्सला हेल्थ इमर्जन्सी घोषीत केली आहे. अनेक देशात याची संख्या वाढल्याचे पुढे आले आहे.भारतात या आजाराविषयी काळजी व्यक्त करीत सावधानता बाळगली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की एमपॉक्सच्या संशयित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. युवकाला एमपॉक्स आहे की नाही याची खातरजामा करण्यासाठी त्याचे नमून घेतले आहेत. त्याची चाचणी सुरु आहे. अनावश्यक घाबरण्याची गरज नाही असे आरोग्य मंत्र्यालयाने म्हटले आहे.
मंत्रालयाने सांगितले की देशात या सारखे वेगवेगळ्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. आणि कोणत्याही संभावित धोक्याला प्रतिबंध करण्यासाठी मजबूत उपाय केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 12 आफ्रीकी देशात या मंकीपॉक्स आजाराची इमर्जन्सी घोषीत केल्यानंतर तीन आठवड्या्नंतर भारतात संशयित एमपॉक्स रुग्ण सापडला आहे.

तपासणी किट्सना मंजूरी

एमपॉक्स संबंधी केंद्र सरकारने पावले उचलली आहे. या आजाराची टेस्टिंग कीट तयार केली जात आहे. सीडीएससीओंनी एमपॉक्सचा शोध घेण्यासाठी तीन टेस्टिंग किटना मंजूरी दिली आहे. आरटी-पीसीआर किट तपासणीसाठी पॉक्सच्या चकत्यांतून तरल पदार्थाचा नमूना काढून त्याची तपासणी केली जाते. आयसीएमआरने देखील या किट्सना मंजूरी दिली आहे.