रविवारी पंजाबमधील (punjab) अमृतसर (amritsar) येथील दलाच्या छावणीवर त्यांच्या सहकाऱ्याने गोळीबार केला. त्यावेळी तिथं असलेल्या 5 जणांना गोळ्या लागल्या आणि त्यांचा जागीचं मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अटारी-वाघा (Attari-Wagah) सीमेपासून 20 किमी अंतरावर असलेल्या खासा येथील फोर्स मेसमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे गोळीबार करणाऱ्या जवानाचा मृत्यू झालेल्या पाच जवानांमध्ये समावेश आहे. तर एक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमृतसर येथील दलाच्या छावणीवर बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे. हा प्रकार नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी करतील. ही घटना घडली त्यावेळी तिथं कोण उपस्थित होतं. गोळीबार करण्याच काय कारण हे सुध्दा स्पष्ट होईल.
5 troops were injured today due to fratricide committed by Ct Satteppa SK at HQ 144 Bn Khasa, Amritsar. Ct Satteppa S K was also injured. Out of the 6 injured, 5 troops incl Ct Satteppa, have lost their lives, one critical. A court of inquiry has been ordered: BSF pic.twitter.com/d17FzAdFkl
— ANI (@ANI) March 6, 2022
कडक पोलीस बंदोबस्तात गुरु नानक देव रुग्णालयात उपचार सुरू
घटना घडल्यानंतर सर्वांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कडक पोलीस बंदोबस्तात गुरु नानक देव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झालेल्या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार आहे. कारण यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एकजण जखमी आहे. जखमीला जवळच्या रूग्णालयात तातडीने हलवण्यात आले. जखमी व्यक्तीची चौकशी केल्यानंतर हे कशामुळं घडलं हे सिध्द होईल. त्याचबरोबर त्यांच्या कॅम्पमधील अनेकांची चौकशी केल्यानंतर कारण स्पष्ट होईल. ही घटना पंजाबमधल्या अटारी-वाघा सीमेपासून 20 किलोमीटर लांब घडली आहे. ही घटना झाल्याचे समजताच अधिका-यांनी घटनास्थळ गाठल्याचं समजतंय.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.