जम्मू-काश्मीरच्या पूछ जिल्ह्यात लष्कराचे एक वाहन दरीत कोसळून पाच जवानांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. येथील मेंढर क्षेत्रातून लष्कराचे वाहन जात असताना अचानक हे वाहन दरीत कोसळले. या अपघातात दहा अन्य जवान जखमी झाल्याचे वृत्त असून लष्कराने हा अपघात घडल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला आहे. या वाहनाचा चालक रस्ता चुकला होता. त्याच दरम्यान वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट खोल दरीत कोसळले.
हा अपघात जम्मू-काश्मीरच्या पूछ जिल्ह्यातील मेंढर येथील बलनोई परिसरात घडला आहे. हा विभाग एलओसीच्या जवळ आहे. लष्कराचे हे वाहन जवानांना पोस्ट जवळ घेऊन चालले होते तेव्हाच हा अपघात घडला आहे. वाहनचालकाचे नियंत्रण अचानक जाऊन वाहन अनियंत्रित झाले आणि दरीत जाऊन कोसळले. या अपघाताचे वृत्त समजताच सैन्याचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले, आणि जवानांना दरीत काढण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.
पूछ जिल्ह्यातील बलनोई विभागात या सैन्याचे वाहन सुमारे तीनशे फूट दरीत अचानक कोसळले. हा अपघात वाहनचालकाच्या चूकीमुळे झाल्याचे म्हटले जात आहे. या वाहनात अनेक सैनिक होते. ते पोस्टींगसाठी निघाले होते. त्याच वेळी हा भीषण अपघात घडला आहे. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने आतापर्यंत पाच जवानांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या घटनास्थळी बचाव पथक पोहचले असून मदतमार्ग वेगाने सुरु आहे.
या अपघातात दहाहून अधिक जवान जखमी झाल्याची बातमी आहे. यापैकी अनेक जवानांची अत्यंत गंभीर अवस्थेत असून त्यांच्या बचावाची मोहीम सुरु झालेली आहे. घटनास्थळी सैन्याचे बचाव पथक पोहचलेले आहे. जखमी जवानांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जम्मू कश्मीर मध्ये गेल्या महिन्यात देखील अशाच प्रकारचा अपघात झाला होता. ज्यात एक जवानाचा मृत्यू झाला होता आणि त्याचे साथीदार जखमी झाले होते. हा अपघात ४ नोव्हेंबर रोजी कालाकोटच्या बडोग गाव येथे झाला होता. यात नायक बद्रीलाल आणि शिपाई जय प्रकाश गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.