नवी दिल्ली: लहान मुलांना घेऊन तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वेतून प्रवास करताना मुलांची काळजी घेणं फार गरजेचे असते. प्रवास करत असताना लहान मुलांकडे दुर्लक्ष झालं तर काय होतं हे एका घटनेमुळे समोर आलं आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक एक्स्प्रेस येथून पाटणा येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये हा प्रकार घडला. मुंबई पाटणा 03202 डाऊन या ट्रेनमध्ये 5 वर्षाचा एक मुलगा रेल्वेच्या डब्यातील बाथरुममध्ये गेला. आत गेल्यानंतर बाथरुमचं दार आतून लॉक झालं आणि तो मुलगा आतचं अडकला. दार बंद झाल्यानं त्या मुलाला ते उघडता येत नव्हतं. (Five year old child boy stuck in toilet of Mumbai Patna train RPF constables how rescued them)
मुंबई पाटणा ट्रेनमधून एक महिला 5 वर्षांच्या मुलासह थ्री टायर एसी डब्यातून प्रवास करत होती. B-3 या डब्यातून ती प्रवास करत होती. रेल्वे डीडीयू स्टेशनवर पोहोचण्यासाठी काही अंतर बाकी असताना खादेजिया बेगम या महिलेचा 5 वर्षांचा मुलगा अरमान बाथरुममध्ये गेला आणि दार आतून बंद केलं. फ्रेश झाल्यानंतर बाहेर येताना त्याला दार उघडता येत नव्हतं त्यामुळे अरमान आतचं अडकला.
खादेजिया बेगम या महिलेला तिचा मुलगा बराच वेळ परत आला नाही त्यामुळं संशय आला. तिने बाथरुमजवळ जाऊन पाहिलं असता दरवाजा आतून बंद झाला होता. त्यामुळे तिनं ही गोष्ट सहप्रवाशांना सांगितली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डब्यात एकच खळबळ माजली होती.
रेल्वे ज्यावेळी डीडीयू जंक्शनजवळ पोहोचली तेव्हा हा प्रकार तेथील सुरक्षारक्षकांच्या लक्षात आणून देण्यात आली आहे. डीडीयू जंक्शनवरील आरपीएफचे अधिकार अश्विनी कुमार आणि आरक्षी नीतीश किमार, आरक्षी सत्यनारायण, पी. के. श्रीवास्तव यांनी ट्रेनमधील पँट्री कारच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दार उघडलं आणि अरमानला सुरक्षित बाहेर काढलं..
‘राजकारणात इतका विश्वास कोणावरच टाकायचा नसतो; फडणवीसजी लूज बॉलवरच मोठी विकेट जाते’ https://t.co/VU9NMcwLyw @rautsanjay61 @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShivSena #RashmiShukla #PhoneTapping
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
संबंधित बातम्या:
(Five year old child boy stuck in toilet of Mumbai Patna train RPF constables how rescued them)