नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी ‘लोकसंख्येचे असंतुलन’ असे वक्तव्य केले होते. त्यावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी (Former chief ec S. Y. Kureshi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. होसाबळे (Dattatreya Hosabale) यांच्या या वक्तव्याविषयी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी संघाचे लोक म्हणायचे की लोकसंख्येत असंतुलन आहे. कारण मुस्लिम जास्त मुलांना जन्म देतात. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या गोष्टी ऐकवल्या जात नाहीत, पण ते लोकसंख्येचे असंतुलन कसे आहे ते सांगितले जात आहे.
त्याचबरोबर धर्मांतर आणि घुसखोरीमुळेही लोकसंख्येचे संतुलन बिघडत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की,53 टक्के मुस्लिम हे कुटुंब नियोजन करत नाहीत, पण 42 टक्के हिंदूदेखील कुटुंब नियोजन करत नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
मुस्लिम दोषी असतील तर हिंदूसुद्धा नंबर दोनचे गुन्हेगार आहेत असंही त्यांनी सांगितले. तर दुसऱ्या क्रमांकावर हिंदूही दोषी आहे. पण त्याकडे देशभक्तीच्या नजरेने पाहू नये, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याभेटीविषयी बोलताना त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारतात घुसखोरी झाली आहे हे त्यांनी मान्यही केले. त्याविषयी ते बोलताना म्हणाले की, आणि त्याची आकडेवारीही सरकारकडे आहे.
मात्र एवढ्या मोठ्या देशात दोन, चार किंवा 10 लाख मुस्लिम आले तर त्याचा संपूर्ण देशातील लोकसंख्येचा तोल फारसा बिघडणार नाही.
मात्र ज्या भागात घुसखोरी होते, त्या भागावर मात्र त्याचा थोडासा परिणाम होतो, पण त्याचा सगळ्या भारतावर परिणाम होईल असं नाही होत.
लोकसंख्येच्या संतुलनावर बोलता बोलता त्यांनी घुसखोरीवरुन सरकार आणि आरएसएसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमच्या संघाचे सरकार आहे.
त्यामुळे ही घुसखोरी तुम्ही थांबवणे गरजेची आहे. त्याबरोबरच बांगलादेशी मुस्लिमांचा फटका भारतीय मुस्लिमांना बसला आहे.
देशातील प्रत्येक मुस्लिमाना बांगलादेशी किंवा पाकिस्तानी असं संबोधले जाते, आणि ते कैक वर्षांपासून हेच चालू आहे. त्यामुळे भारतात होणारी घुसखोरी ही थांबवणे गरजेची आहे.
शिक्षणाचा योग्य प्रचार आणि प्रसार झाला, उत्पन्न वाढले आणि सेवा वितरणाची सोयी झाल्यानंतरसुद्धा लोकसंख्या कमी होते.
तर दुसरीकडे मात्र भारतातील मुस्लिम हा सर्वाधिक मागासलेला आहे. त्यामुळे लोकसंख्या धोरणाबरोबरच या जनजागृती आणि पायाभूत सुविधाही उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितले.