माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एसएम कृष्णा यांच मंगळवारी ( 10 डिसेंबर) निधन झालं. बंगळुरू येथील निवासस्थानी मंगळवारी 2.45 च्या सुमारासा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि प्रियांक खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला.
एसएम कृष्णा यांनी 11 ऑक्टोबर 1999 ते 20 में 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्याव्यतिरिक्त 6 डिसेंबर 2004 ते 8 मार्च 2008 दरम्यान ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
एसएम कृष्णा यांची कारकीर्द
एसएम कृष्णा यांचा जन्म 1 में 1932 साली कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील मद्दुर तालुक्यातील सोमनहल्ली गावात झाला. त्यांचं पूर्ण नाव सोमनहल्ली मल्लया कृष्णा असं होतं. त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण हत्तूर येथे, माध्यमिक शिक्षण श्री रामकृष्ण विद्याशाळा, म्हैसूर येथून घेतलं. त्यानंतर म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी आणि आणि युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी पूर्ण केली.अमेरिकेतील सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठ आणि वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली.
एसएम कृष्णा यांनी 1962 मध्ये मद्दूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून निवडणूक राजकीय जीवनात प्रवेश केला आणि विजय मिळवला. यानंतर त्यांनी ‘प्रजा सोशलिस्ट पार्टी’मध्ये प्रवेश केला, परंतु 1967 च्या निवडणुकीत ते मद्दूरमधून काँग्रेसच्या एमएम गौडा यांच्याकडून पराभूत झाले. 1968 मध्ये विद्यमान खासदाराचे निधन झाल्यावर त्यांनी मंड्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. 1968 साली झालेल्या पोटनिवडणुकीनंतर ते मंड्या मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1971 आणि 1980 मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. त्यावेळी काँग्रेसचा बालेकिल्ला मंड्या हा मतदारसंघ वाचवण्यात एसएम कृष्णा यांची महत्त्वाची भूमिका होती.
प्रियांक खर्गे यांच्याकडून दु:ख व्यक्त
एसएम कृष्णा यांच्या निधनाबद्दल समजातच प्रियांक खर्गे यांनी दु:ख व्यक्त केले. “श्री एस एम कृष्णा यांच्या निधनाने खूप दुःख झाले. मुख्यमंत्री आणि नेते म्हणून त्यांनी राज्य आणि राष्ट्रावर अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणाने कर्नाटकच्या प्रगतीला आकार दिला आणि बंगळुरूमध्ये त्यांच्या कॉर्पोरेट दृष्टिकोनामुळे त्यांना ओळख मिळाली, ते अनेक लोकांचे प्रिय बनले. बंगळुरूला जागतिक शहर म्हणून प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या संकल्पनेचा लाभ आपण अजूनही घेत आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचे योगदान भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहो.” अशा शब्दांत प्रियांक खर्गे यांनी श्रद्धांजली वाहिली.
Deeply saddened by the demise of Shri S.M. Krishna, the former Chief Minister of Karnataka, whose legacy of leadership and public service has left an indelible mark on our state and nation.
His vision and dedication shaped Karnataka’s progress and his corporate approach towards… pic.twitter.com/z5hP4OnDwY
— Priyank Kharge / ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ (@PriyankKharge) December 10, 2024
चंद्राबाबू नायडू यांनीही व्यक्त केला शोक
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही शोक व्यक्त केला.
I’m deeply saddened to hear about the passing of former Karnataka Chief Minister, Sri SM Krishna Garu. Our friendship transcended the competitive spirit we shared in attracting investments to our respective states. He was a true leader who always prioritized the welfare of his… pic.twitter.com/JjtAw4g2ug
— N Chandrababu Naidu (@ncbn) December 10, 2024