बंगळुरु : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD Deve Gowda) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी चेन्नम्मा यांनाही संसर्ग झाला असून दोघं राहत्या घरीच सेल्फ आयसोलेट झाले आहेत. देवेगौडा यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. देवेगौडा दाम्पत्याची तब्येत सुधारावी, यासाठी प्रार्थना करत असल्याचं मोदींनी ट्विटरवर सांगितलं. (Former PM HD Deve Gowda Wife Chennamma tested COVID Positive Self-Isolating With Family)
“माझी पत्नी चेन्नम्मा आणि मी कोव्हिड19 पॉझिटिव्ह आहोत. आम्ही कुटुंबातील इतर सदस्यांपासून स्वत:ला विलग करत आहोत. गेल्या काही दिवसांपासून आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो. पक्षातील कार्यकर्ते आणि शुभचिंतकांनी कृपया घाबरुन जाऊ नये” असे ट्वीट देवेगौडा यांनी केले आहे.
My wife Chennamma and I have tested positive for COVID-19. We are self-isolating along with other family members.
I request all those who came in contact with us over the last few days to get themselves tested. I request party workers and well-wishers not to panic.— H D Devegowda (@H_D_Devegowda) March 31, 2021
देवेगौडा हे दक्षिण बंगळुरुतील पद्ननाभनगर भागात राहतात. देवेगौडा यांच्या प्रकृतीविषयी समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. देवेगौडा दाम्पत्याची तब्येत सुधारावी, यासाठी प्रार्थना करत असल्याचं मोदींनी ट्विटरवर सांगितलं. मोदींनी शहरातील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याचा प्रस्ताव दिल्याबद्दल देवेगौडांनी आभार व्यक्त केले.
Spoke to former PM Shri @H_D_Devegowda Ji and enquired about his and his wife’s health. Praying for their quick recovery.
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2021
I am grateful to Prime Minister @narendramodi for calling and enquiring after my health. I am also deeply moved by his offer to get me treated in any hospital of my choice in any city. I assured him that I am being looked after well in Bangalore, but will keep him informed.
— H D Devegowda (@H_D_Devegowda) March 31, 2021
सोनियांच्या आग्रहास्तव पुन्हा राज्यसभेवर
जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) सर्वेसर्वा एचडी देवेगौडा गेल्याच वर्षी राज्यसभेवर निवडून आले. देवेगौडा यांनी वयाच्या 87 व्या वर्षी निवडणूक लढवण्यास उत्सुकता दर्शवली नव्हती. मात्र काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या आग्रहानंतर देवेगौडा यांनी अर्ज भरला आणि ते बिनविरोध निवडून आले. देवेगौडा यांचे पुत्र एचडी कुमारस्वामीही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत.
अकरा महिन्यांसाठी पंतप्रधानपद
देवेगौडा यांनी 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997 या अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. 1994 ते 1996 या काळात ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत.
एचडी देवेगौडा यांची राजकीय कारकीर्द
1953 मध्ये काँग्रेसमधून देवेगौडांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. मात्र नऊ वर्षांनी त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. 1962 ते 1989 या काळात त्यांनी अपक्ष म्हणून होलेनारसीपुरा विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडणूक जिंकली. आणीबाणीच्या काळात (1975–77)त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. 1994 मध्ये जनता दलाच्या अध्यक्षपदाची सूत्र त्यांनी स्वीकारली. पुढे दोन वर्ष त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. तर त्यानंतर पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
पंतप्रधानपदानंतरही 1998, 2004, 2009 आणि 2014 असे सलग चार वेळा ते जनता दल सेक्युलरतर्फे कर्नाटकातील हसन मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. देवेगौडा यांनी तुमकूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.
संबंधित बातम्या :
सोनियांच्या आग्रहानंतर माजी पंतप्रधान पुन्हा रिंगणात, 87 व्या वर्षी राज्यसभा उमेदवारी
(Former PM HD Deve Gowda Wife Chennamma tested COVID Positive Self-Isolating With Family)