PM Manmohan Singh Death : संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा दिग्गज अर्थतज्ज्ञ हरपला, देशभरातून हळहळ व्यक्त

| Updated on: Dec 27, 2024 | 12:13 AM

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक स्तरावरुन श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

PM Manmohan Singh Death : संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा दिग्गज अर्थतज्ज्ञ हरपला, देशभरातून हळहळ व्यक्त
Follow us on

PM Manmohan Singh Death : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं आज (२६ डिसेंबर) निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्वास्थामुळे रात्री 8 च्या सुमारास त्यांना नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री 9.51 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता कुलकर्णी यांच्यासह अनेक स्तरावरुन श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एक सन्माननीय अर्थतज्ज्ञ म्हणून ते ओळखले जात. विविध सरकारी पदांवर त्यांनी उत्तमरित्या काम केले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण असायचा. विशेष म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांची लोकांचे जीवन सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले.

राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली

डॉ. मनमोहन सिंग यांनी अफाट बुद्धी आणि सचोटीच्या जोरावर भारताचे नेतृत्व केले. त्यांची अर्थशास्त्राबद्दल असलेली सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी एक गुरु आणि उत्तम मार्गदर्शक गमावला, असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

मल्लिकार्जुन खरगेंनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली श्रद्धांजली

देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण एक महान अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी गमावला. त्यांनी १० वर्षे पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या मनःपूर्वक संवेदना, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धांजली