Harish Salve तिसऱ्यांदा बोहल्यावर, ललित मोदी, नीता अंबानींची लग्नाला हजेरी! पाहा video

| Updated on: Sep 04, 2023 | 2:28 PM

Harish Salve Wedding : ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी तिसऱ्यांदा विवाह केला आहे. वयाच्या 68 व्या वर्षी साळवे यांनी तिसरा विवाह केल्याने त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Harish Salve तिसऱ्यांदा बोहल्यावर, ललित मोदी, नीता अंबानींची लग्नाला हजेरी! पाहा video
Follow us on

मुंबई : भारतामधील ज्येष्ठ वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकले आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हिट अँड रन केस, कुलभूषण जाधव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे हायप्रोफाईल केस लढवलेल्या हरीश साळवे यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर जोरादार व्हायरल झाले आहेत. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या विवाहाची जोरदार चर्चा आहे.

 

हरीश साळवे यांनी ब्रिटनच्या त्रिना या तरूणीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. धुमढडाक्यामध्ये साळवेंनी आपला तिसरा विवाह सोहळा केला. या सोहळ्याला ललित मोदी, नीता अंबानी,  उज्ज्वला राऊत यासारखी मोठी मंडळी  उपस्थित होतीत.

हरिश साळवे यांचा पहिला विवाह मीनाक्षी यांच्याशी झाला होता. दोघांचा जवळपास 38 वर्षांचा संसार होता. मात्र त्यांनी 2020 साली त्यांनी दुसरा विवाह केला होता. मात्र साळवेंचा हा विवाह फारस काही काळ टिकला नाही. त्यांनी आता ब्रिटनमधील आपल्या मैत्रिणीसबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, हरिश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची केस लढण्यासाठी अवघ्या एक रूपयाचं मानधन घेतलं होतं. त्यावेळी त्यांचं सर्व देशभरातून कौतुक झालं होतं.  2015 साली हरीश साळवे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच वर्षी त्यांच्याकडे सलमानची हिट अँड रनची केस आली होती. सलमानला यामध्ये पाच वर्षांची शिक्षा झालेली मात्र त्यांनी डिसेंबर 2015 मध्ये सलमानाची या प्रकरणांमधून निर्दोष म्हणून सोडवलं होतं.