नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden in India) दिल्लीत जी20 शिखर संमेलनासाठी (G 20 Summit) भारतात दाखल होत आहे. या शिखर संमेलनात जगभरातील नेते सहभागी होत आहे. बायडेन भारत यात्रेवर येत असल्याने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्षांची स्वतःची सुरक्षा व्यवस्था असते. ते जगभरात कुठेही पोहचले तरी हा लवाजमा सोबतच असतो. राष्ट्राध्यक्षांचे कॅडिलॅक ‘द बीस्ट’ मधून ते यात्रा करतात. द बीस्ट हे बोईंग सी -17 ग्लोबमास्टर III मधून भारतात आणण्यात येईल. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष शुक्रवारी संध्याकाळी पोहचत आहेत. येत्या दोन दिवसांत भारतात सर्व विश्वाचे दर्शन होईल. या दौऱ्यात सर्वांचे लक्ष जो बायडेन यांच्या सोबत असलेल्या एका ब्लॅक ब्रीफकेसवर (Black Briefcase) असते. ही काळी ब्रीफकेस त्यांच्या सोबत का असते, असा सहज सवाल अनेकांना पडतो. काय खास आहे या ब्रीफकेसमध्ये..
4 राष्ट्राध्यक्षांची हत्या
आतापर्यंत अमेरिकेच्या 4 राष्ट्राध्यक्षांची हत्या झाली आहे. अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. त्याला जगाचा दादा असे म्हणतात. यापूर्वी झालेल्या हत्येतून अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या सुरक्षेसाठी मोठा तगडा बंदोबस्त असतो. राष्ट्राध्यक्षावर हल्ला होऊ नये यासाठी खास फलटण तैनात असते.
काय आहे Black Briefcase
राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सीक्रेट सर्व्हिसेस एजंटकडे सोपविण्यात आली आहे. 1901 पासून ही परंपरा सुरु आहे. हे एजंट एडव्हान्स टेक्नॉलॉजीसह सुरक्षा करतात. त्यांच्याकडे काळ्या रंगाची एक ब्रीफकेस असते. प्रत्येक दौऱ्यात ही ब्रीफकेस सोबत असते. या ब्रीफकेसमध्ये न्युक्लिअर मिसाईल प्रक्षेपण करण्यासाठीचा एक्सेस असतो. राष्ट्राध्यक्षाच्या दौऱ्या दरम्यान अणू हल्ला झाला. तर त्यावेळी अणू हल्ल्याचा आदेश देण्यासाठी ही ब्रीफकेस सोबत असते.
ट्रिपल सुरक्षा
जो बायडेन दिल्ली दौऱ्यावर येत आहे. त्यांच्यासाठी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असते. सर्वात बाहेर अर्धसैनिक दल असतात. दुसऱ्या परीघात विशेष सुरक्षा कमांडो असतात. तर तिसऱ्या परीघात सीक्रेट सर्व्हिसेस एजेंट असतात. बायडेन आणि इतर अमेरिकन प्रतिनिधी, आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये थांबणार आहेत. ते सर्वात अगोदर या परिसराची, कर्मचाऱ्यांची, संबंधित व्यक्तीची तपासणी करतील. राष्ट्राध्यक्ष ज्या ठिकाणी राहणार आहेत. त्याठिकाणची पाहणी पण ते करणार आहेत.
असा हा खास सूट
प्रेसिडेंशिअल सूट आयटीसी मौर्या हॉटेलच्या 14 व्या मजल्यावर आहे. चाणक्य सूट असे त्याचे नाव आहे. हा सूट 2007 पासून अतिविशेष पाहुण्यांसाठी राखीव आहे. सूटमध्ये यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष थांबले होते. याठिकाणी यापूर्वी जॉर्ज डब्ल्यू बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामा आणि डॉनल्ड ट्रम्प थांबलेले आहेत. हा सूट 4600 चौरस फुटावर आहे.