नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कॉंग्रेस पक्षाच्या (Congress Party) सगळ्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या (BJP) आणि अन्य पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर भाजप पक्षात सामील होणार असल्याची देखील चर्चा होती. परंतु गुलाम नबी आझाद यांनी या सगळ्या तर्कांना पुर्णविराम दिला आहे. मी पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे. त्याचबरोबर मी माझा स्वत:चा पक्ष तयार करणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे गुलाम नबी आझाद इतर पक्षात जाण्याची शक्यता कमी झाली आहे. मागच्या तीन वर्षापासून भाजपमध्ये जात असल्याची भाजपाने चर्चा सुरु केली होती. तसेच ते एव्हढ्यावर न राहता त्यांनी थेट मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील केलं होतं असं गुलाम नवी आझाद यांनी जाहीर केलं आहे.
सकाळपासून गुलाम नबी आझाद हे नेमकं कोणत्या पार्टीत जाणार अशी चर्चा होती. कारण मागच्या काही महिन्यात ज्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला आहे त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे गुलाम नबी आझाद हे भाजपमध्ये जाणार असल्याची मोठी चर्चा होती. पण त्यांनी मी कॉंग्रेस सोडल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर मी तिथं माझा नवा पक्ष स्थापन करणार आहे. भविष्यात तो पक्ष मी राष्ट्रीय राजकारणात आणणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
ज्यावेळी गुलाम नबी आझाद यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्ष मी भाजपमध्ये येणार असल्याचं तीन वर्षांपासून सांगत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील बनवलं असल्याचं जाहीर केलं होतं. ज्यावेळी त्यांना भाजपच्या नेत्यांचा फोन आला होता का ? असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मला भाजपचे नेते का फोन करतील मी थोडी भाजपमध्ये आहे असं उत्तर दिलं. माझे सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. मी आत्तापर्यंत कोणत्याही पक्षावरती टीका केलेली नाही.