गुलाम नबी आझादांचा नवा निर्णय, जम्मू काश्मीरमध्ये लवकरच घोषणा

| Updated on: Sep 26, 2022 | 9:14 AM

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर महिनाभरातच गुलाम नबी आझाद नवी घोषणा करणार आहेत. त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

गुलाम नबी आझादांचा नवा निर्णय, जम्मू काश्मीरमध्ये लवकरच घोषणा
Image Credit source: social media
Follow us on

संदीप राजघोळकर, नवी दिल्लीः काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आझाद स्वतःच्या नव्या पक्षाची (New Party) घोषणा आज करतील, असे संकेत आहेत. रविवारीच आझाद जम्मूत (Jammu) पोहोचले आहेत. त्यांनी निकटवर्तीय नेत्यांशी काल दीर्घ चर्चा केली आहे. आज सोमवारी ते एक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात नव्या पक्षाचं नाव जाहीर करतील. काँग्रेस अध्यक्ष पद, राजस्थान काँग्रेस यावरून घमासान सुरु असतानाच काँग्रेसमधून बाहेर पडलेले गुलाम नबी आझाद यांच्या आजच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

जम्मू काश्मीरमध्ये एका सार्वजनिक बैठकीत आझीद यांनी पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते. तसेच जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्याचा आमचा अजेंडा असेल हेदेखील स्पष्ट केले होते.

जम्मू काश्मीरमधील लोकच पक्षाचं नाव आणि झेंडा कोणता असेल, हे ठरवतील, असेही ते म्हणाले होते. मात्र प्रत्येकाला समजेल अशा भाषेत हिंदुस्तानी नाव या पक्षाला असेल, असे ते म्हणाले होते.

जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा, जमीन खरेदी करण्याचा अधिकार आणि स्थानिकांना रोजगार या त्रिसूत्रीवर हा पक्ष काम करेल, असं आझाद म्हणाले होते.

२६ ऑगस्ट रोजी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनाम दिला होता. त्यांच्या पाठोपाठ जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह अनेक माजी मंत्री आणि आमदारांनी काँग्रेसला दूर केलं.

रविवारी गुलाम नबी आझाद यांनी आपल्या समर्थकांची दीर्घ चर्चा केली. जम्मूमध्ये यासाठी विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं.

नव्या पक्षात शामील होणारे नेते आणि सहकारी या बैठकांना उपस्थित होते. विशेषतः माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, डॉ. मनोहर लाल शर्मा, अब्दुल मजीद वाणी, जीएम सरोरी, गौरव चोप्रा आदी स्थानिक नेते या बैठकीला उपस्थित होते.