नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : देशात मान्सून सक्रिय झाला. उत्तर भारताला पावसाने झोडपून काढले. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरु आहे. शेतात भाजीपाल्याचे (Vegetables Price) नुकसान झाले. त्यामुळे भाजीपाला कडाडला आहे. देशभरात जवळपास सर्वच भाज्या महागल्या आहेत. भेंडी, शिमाल मिर्ची, भोपळा, पडवळ, कारले यांच्या किंमती कितीतरी पटीत वाढल्या. टोमॅटोचे भाव (Tomato Price) अचानकच गगनाला भिडले. गेल्या महिनाभरताच किंमती 25 रुपयांनी किंमती काही ठिकाणी 300-350 रुपयांच्या घरात पोहचल्या. आजही काही ठिकाणी टोमॅटोचा भाव 150 ते 200 रुपये किलो आहे. तर काही ठिकाणी हा भाव 100 ते 150 रुपये किलो या दरम्यान आहे. आता टोमॅटोसमोर अद्रकीने आव्हान उभे केले आहे. अनेक शहरात अद्रकीने (Ginger Price) टोमॅटोला मागे टाकले आहे.
पाटणा रडकुंडीला
बिहारची राजधानी पाटनामध्ये भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटो 120 ते 140 रुपये किलो विक्री होत आहे. दुसऱ्या शहरात आणि निम शहरात किंमती 100 रुपये किलो आहेत. पण आता टोमॅटोला अद्रकने मागे टाकले आहे. पाटण्यात एक किलो अद्रकीची किंमत 240 ते 250 रुपये आहे. टोमॅटोपेक्षा अद्रकीचा भाव दुप्पट आहे.
कर्नाटकमध्ये लांब उडी
कर्नाटकमध्ये अद्रकीने मोठी उसळी घेतली. या ठिकाणी एक किलो अद्ररकीचा भाव 400 रुपयांवर पोहचला आहे. या दशकात पहिल्यांदाच किंमती गगनाला भिडल्या आहेत. बेंगळुरु शहरात टोमॅटोचा भाव 130 ते 150 रुपयांदरम्यान आहे.
असे वधारल्या किंमती
कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्हात अद्रकीला विक्रमी भाव मिळाला आहे. 60 किलो अद्रकीच्या पोत्याला पूर्वी कमी भाव होता. व्यापारी गेल्यावर्षी 2022 मध्ये या पोत्यासाठी 2,000 ते 3,000 रुपये मोजत होते. आता हाच भाव 11,000 रुपयांवर पोहचला आहे.
दिल्लीत भाव काय
देशाची राजधानी दिल्लीत अद्रकीने टोमॅटोला धोबीपछाड दिली आहे. याठिकाणी टोमॅटोचा भाव 200 रुपये किलो आहे. काही ठिकाणी हाच भाव 250 रुपये झाली आहे. तर किरकोळ बाजारात अद्रकीचा भाव 240 ते 250 रुपये किलोवर पोहचला आहे. गेल्या आठवड्यात अद्रकीने मोठी उसळी घेतली होती. एक किलो अद्रकीचा भाव 400 रुपयांवर पोहचला होता.
कोलकत्तामध्ये 220 रुपये किलो अद्रक
पश्चिम बंगालची राजधानीत अद्रकीने टोमॅटोला मागेल टाकले आहे. कोलकत्ता मध्ये टोमॅटोचा भाव शुक्रवारी 140 रुपये किलो होता. तर अद्रक 220 रुपये किलोवर पोहचली आहे.
शेतकरी पोलीस ठाण्यात
कर्नाटकातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील 1.8 लाख रुपयांची अद्रक चोरीची तक्रार दिली आहे. तर होरलावडी येथील शेतकऱ्याने 10,000 रुपयांच्या अद्रक चोरीची फिर्याद दिली आहे. बिलिगेर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दिली. शेतकऱ्यांनी आता शेतात पण सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात केली आहे.