पणजी : गोव्यात प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी 28 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी भाजप (BJP) आमदारांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. प्रमोद सावंत यांनी आज गोव्यातील मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर केलं आहे. खातेवाटप जाहीर ( Allocation of portfolios) करताना प्रमोद सावंत यांनी मोठी चाल खेळली आहे. प्रमोद सावंत यांनी स्वत:कडे गृह आणि वित्त खातं ठेवलं आहे. मुख्यमंत्री पदी कोण असणार याची निश्चिती होण्यापूर्वी नाराज असलेल्या विश्वजित राणे यांच्याकडे आरोग्य खात्यासह नगरविकास खातं देण्यात आलं आहे. तर, मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचा पराभव करणाऱ्या बाबूश मोन्सेरात यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलं आहे.
Allocation of portfolios in Goa- CM Pramod Sawant gets Home, Finance, Personnel, Vigilance, Official Languages and several other departments pic.twitter.com/OUuO01hVoR
— ANI (@ANI) April 3, 2022
भाजपनं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर गोव्यातील स्थानिक पक्षांच्या मदतीनं गोव्यात भाजपनं सरकार स्थापन केलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं प्रमोद सावंत यांच्या कामावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर संधी दिली आहे. प्रमोद सावंत हे गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना 28 मार्चला मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती.
मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या विश्वजीत राणे यांना आरोग्य, नगरविकास व नगरनियोजन, महिला व बाल कल्याण आणि वने ही खाती देण्यात आली आहेत. तर, उत्पल पर्रिकर यांचा पराभव करणाऱ्या बाबुश मोंसेरात यांना महसूल, कामगार, कचरा व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत.
इतर बातम्या:
मनसे मेळाव्यात प्राजक्ता माळीची हजेरी; म्हणाली ‘जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसंच..’
आता 28 नव्हे 31 दिवसांचा रिचार्जही मिळणार, Vodafone Idea चे कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन लाँच