पणजी : गोव्यात ऑक्सिजनअभावी (Goa Oxygen shortage) मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. इथे दररोज श्वास गुदमरुन अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोव्यात अक्षरश: मृत्यूचं (Goa corona death) तांडव उभं आहे. सलग चौथ्या दिवशी ऑक्सिजनअभावी 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Goa Medical College and Hospital) गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटे सहा वाजेपर्यंत 13 तर शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे 8 कोरोना रूग्णांचा तडफडून मृत्यू झाला. प्राणवायूअभावी आजपर्यंत 83 रुग्णांचा बळी गेला आहे. (Goa oxygen shortage another 13 lost live Over 83 dead in Goas hospital due to Oxygen shortage )
उच्च न्यायालयाने याच विषयावर सरकारला फटकारले असूनही रुग्ण दगावण्याचे सत्र सुरुच आहे. परिणाणी गोव्याचे आरोग्य खाते तोंडावर पडले आहे.
दरम्यान, गोव्यात मिडनाईड मर्डर्स सुरुच आहे, अशी घणाघाती टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी केली. गोव्यात कालही अनेक मृत्यू झाले. गोव्यातील हे हत्येची मालिका आता थांबायला हवी. गोवा सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर द्यायला हवं, असं विजय सरदेसाई म्हणाले.
More deaths at the @Goagmc last night too ! Midnight ‘murders’ continue! Another 8 #Goemkars have lost their lives leaving #Goa broken and in despair! This serial killing of #Goans has to stop! The @GovtofGoa and the @goacm must answer for this disaster.
— Vijai Sardesai (@VijaiSardesai) May 15, 2021
मेले चेकनाक्यावर गुरुवारी मध्यरात्री प्राणवायूचा वाहतूक करणारा टँकर जास्तवेळ अडवून ठेवल्याने खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंदार आडपाईकर या वाहतूक अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. कर्नाटकातून येणाऱ्या त्या टँकरने सरकारचा उपकर भरला नाही म्हणून मेले चेकनाक्यावर 20 मिनिटे टँकरला अडवून ठेवण्यात आले होते.
मृत्यूचे सत्र रोखण्यासाठी हॉस्पिटलच्या संकुलात 20 हजार लिटर द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन टाकी बसवण्याचे काम सुरू झाले आहे. 16 मे पर्यंत टाकी बसवण्यात येईल आणि 17 मे पर्यंत टाकीत ऑक्सिजन साठवण्याचे काम सुरु होईल.
11 मे : 26 रुग्ण
12 मे : 21 रुग्ण
13 मे : 15 रुग्ण
13-14 मे : 13 रुग्ण
14-15 मे : 8 रुग्ण
गोव्यात आतापर्यंत एकूण 2 हजारच्या जवळपास कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ऑक्सिजनअभावी झालेल्या मृतांचा आकडा भयावह आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने फटकरल्यानंतर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गोवा सरकारने काय म्हटले आहे? –
1.प्रशिक्षित ट्रॅक्टर ड्रायव्हर नसल्यामुळे सिलिंडर वाहतूक गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात करण्यास व्यत्यय येत आहे. सरकारने कोल्हापूरहून 8 प्रशिक्षित ड्रायव्हर मिळवले आहेत. दोन अतिरिक्त हायपावर ट्रॅक्टर उपलब्ध करण्यात आले आहेत.
2. महामारी काळात अॅम्ब्युलन्स आणि शववाहिका दुप्पट आणि कधीकधी तिप्पट दर आकारत असल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाला होता. या दोन्ही सेवेतील ऑपरेटर्सवर निर्बंध घालण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
3. केंद्राकडून मिळालेल्या 323 ऑक्सिजन कांसनट्रेटर्स पैकी 263 गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालय, फोंडा येथील आयडी इस्पितळ येथे 30, म्हापसा येथील आझिलो इस्पितळात 20 तर डिचोली येथील केशव सेवा साधना संस्थेच्या केंद्रात 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स पुरविल्याचे सरकारने म्हटले आहे. आपल्या घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीही रिकामे सिलेंडर भरून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
संबंधित बातम्या
गोव्यात उद्रेक, ऑक्सिजन अभावी आधी 26, आता 15 रुग्णांचा मृत्यू!
Goa oxygen shortage another 13 lost live Over 75 dead in Goas hospital due to Oxygen shortage