हरियाणा निवडणूक निकालाच्या धामधुमीत ‘गोहाना का जलेबा’ का ट्रेंड होतोय !

| Updated on: Oct 08, 2024 | 3:17 PM

हरियाणा निवडणूकांचे निकाल जसजसे येऊ लागले तसतशी सोशल मीडियावर वेगवान हालचाली होऊ लागल्या. एक्सवर मिम्स अक्षरश:वर्षाव सुरु झाला.निवडणूक निकालाच्या चढ-उताराच्या खेळात सोशल मिडीयावर हरियाणाचा जलेबा ट्रेंड होऊ लागला.

हरियाणा निवडणूक निकालाच्या धामधुमीत गोहाना का जलेबा का ट्रेंड होतोय !
Follow us on

हरियाणा निवडणूकीत भाजपाला पुन्हा एकदा सत्तेचे सोपान चढण्याची संधी मिळाली आहे. तर कॉंग्रेसचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. त्यातच सोशल मिडीयावर मिम्सचा पुर आला आहे. निवडणूक निकालाच्या सुरुवातील सत्तेचा पारडे कधी कॉंग्रेसच्या बाजूने होते तर कधी भाजपाच्या..परंतू याच दरम्यान सोशल मिडीयावर मिम्सद्वारे मनोरंजन होत होते. यंदा सोशल मीडीयावर जिलेबी ट्रेंड होत होती.

कॉंग्रेसचे मिम्स –

हरियाणाच्या निवडणूक निकालांचे जसे आकडे येऊ लागले तसे सोशल मिडीयावर पारा वाढला. मिम्सचा अगदी पूरच आला आहे. निवडणूक निकालांच्या चढउतारात लोकांनी मिम्सचा आधार घेत मासलेवाईक सल्ले सुरु केले. यात हरियाणाचा गोहाना जलेबा ट्रेंडमध्ये आला. ही कहाणी हरियाणाच्या गुहाना येथील आहे. निवडणूक प्रचारात कॉंग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी एका रॅलीत प्रसिद्ध ‘मातू राम’च्या जिलेबीचा डब्बा गिफ्ट दिला होता. राहुल गांधी यांनी यावेळी जिलेबीची प्रशंसा केली. आणि तिच्या निर्याती संदर्भात वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की या जिलेबी मोठ्या कारखान्यात बनवायला हव्यात. त्याने रोजगार वाढेल आणि देश-विदेशात ही जिलेबी निर्यात होऊ शकेल.

सोशल मिडीयात राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आले होते. आणि निवडणूक निकालात पुन्हा जिलेबीचा मुद्दा आला. लोक निवडणूक निकालाची तुलना जिलेबीच्या वाकड्या तिकड्या आकाराशी करु लागले. कारण आधी कॉंग्रेस अनेक जागांवर पुढे होती.दुपारी कॉंग्रेस पुन्हा मागे पडली. या मजेदार स्थितीवरुन कॉंग्रेसचे जिलेबीशी तुलना होऊ लागली.मिम्सचा पुर सुरु झाला.निकाल सुरुवातील कॉंग्रेसच्या बाजूने लागल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते जल्लोशाची तयारी करीत होते. दिल्ली स्थित AICC च्या मुख्यालयात लाडू आणि जिलेबी वाटण्यात आली.परंतू दुपारनंतर पारडे फिरले.आणि कॉंग्रेसच्या गोटात नाराजी पसरली.

गोहाना जिलेबीचा इतिहास

गोहाना येथील जिलेबीचा इतिहास रंजकदार आहे. मातूराम यांनी साल 1985 मध्ये ही जिलेबी विकायला सुरुवात केली. त्यांचे नातू रमन आणि नीरज गुप्ता आता ही गादी सांभाळत आहेत. ही जिलेबी शुद्ध घी पासून तयार केली जाते. सर्वसाधारण जिलेबी पेक्षा मोठी असते. ज्यामुळे जिला जिलेबी न बोलता जलेबा म्हटले जाते. प्रत्येक जिलेबीचे वजन सुमारे 250 ग्रॅम असते. जिलेबीचा एक किलोचा डब्बा असतो.त्यात केवळ चार पिस असतात, तो 320 रुपयांना मिळतो.