NEET 2024 Exam | परीक्षा पेपर लीक प्रकरणी सरकार अडचणीत, रिक्षावाल्याचा मुलगा पुढे सरसावला, मांडली ठाम भूमिका

| Updated on: Jun 20, 2024 | 5:51 PM

पेपर फुटी प्रकरणी सरकार पहिल्यांदाच अडचणीत आल्याचे दिसत आहे. या संकट काळात एका रिक्षाचालकाचा मुलगा सरकारची बाजू मांडण्यासाठी पुढे आला आहे. कोण आहे हा मुलगा?

NEET 2024 Exam | परीक्षा पेपर लीक प्रकरणी सरकार अडचणीत, रिक्षावाल्याचा मुलगा पुढे सरसावला, मांडली ठाम भूमिका
neet exam 2024
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

NEET 2024 Exam Paper Leak Case : NEET च्या पेपर लीक प्रकरणी सरकार बॅटफूटवर आले होते. पण, UGC NET पेपर लीकमुळे सरकारवरील दबाव आणखी वाढला आहे. NEET प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर शिक्षण विभागाच्या सहसचिवांनीही पत्रकार परिषद घेतली. पेपर फुटीप्रकरणामुळे सरकार पहिल्यांदाच अडचणीत आल्याचे दिसत आहे. सरकारच्या या संकटकाळात एका रिक्षाचालकाचा मुलगा सरकारची बाजू मांडण्यासाठी पुढे आला आहे.

रिक्षा चालकाचा हा मुलगा म्हणजेच शिक्षण विभागाचे सहसचिव गोविंद जैस्वाल. दुप्रिया घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोविंद जैस्वाल यांनी सांगितले की, ‘पेपरमध्ये छेडछाड होण्याची शक्यता लक्षत घेऊन आम्ही परीक्षा रद्द केली, हे प्रकरण सीबीआयकडे पाठवले. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आम्ही सक्रिय पाऊल उचलले आहे. यात जो कोणी सहभागी असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ते म्हणाले.

नीट पेपर लीक प्रकरणात बिहार पोलिसांनी आतापर्यंत चार उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह 13 जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी बिहारचे आहेत. इकॉनॉमिक ऑफेन्स युनिटने (EOU) केलेल्या तपासात आरोपींकडून 6 पोस्ट-डेटेड चेक जप्त केले आहेत. हे चेक गेल्या महिन्यात नीटच्या पेपर लीक प्रकरणात देण्यात आले होते. प्रत्येक उमेदवाराकडून 30 लाखांपेक्षा जास्त रुपयांची मागणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बिहारमधील सात आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील प्रत्येकी एक अशा आणखी नऊ उमेदवारांना तपासात सहभागी होण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.

कोण आहेत गोविंद जैस्वाल?

IAS गोविंद जयस्वाल हे उत्तर प्रदेशातील वाराणसीचे रहिवासी आहेत. गोविंद जैस्वाल यांचे वडील एका रिक्षा कंपनीचे मालक होते. त्यांच्याकडे 35 रिक्षा होत्या. गोविंद यांची आई ब्रेन हॅमरेजची शिकार झाली होती. पत्नीच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी वडिलांनी बहुतेक रिक्षा विकल्या. त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडली. गोविंद सातवीमध्ये असताना आईचे निधन झाले. त्यामुळे वडील, मुलगा गोविंद आणि मुलीसह काशी येथील अलायपुरा भागात दहा बाय बाराच्या खोलीत रहायला गेले. येथे राहूनच गोविंद यांनी आपला पुढील शैक्षणिक प्रवास केला.