हमीरपूर (उत्तर प्रदेश) : सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते ED सह केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावरच आहेत की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण या तपास यंत्रणांच्यामुळे राज्यातील अनेक बडे नेते हे सध्या जेलमध्ये आहेत. तर काहींचा नंबर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप होताना दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या सांगण्यावरून हे छापे टाकत आहेत. मात्र केंद्रीय तपास यंत्रणा या असे कोणाच्या सांगण्यावरून असे छापे टाकत नाही असे आपल्या कृतीने CGST पथकाने दाखवून दिले आहे. CGST पथकाने उत्तर प्रदेशातील एका गुटखा व्यवसायिकाच्या (Gutkha Businessman) घरावर छापा टाकत 18 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्याकडील 6 कोटी 31 लाख 11 हजार 800 रुपये जप्त केले आहेत. इतकेच काय यावेळी तपासात या गुटखा व्यवसायिकाचा असणारा कारखाना नोकरांच्या नावावर असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे छापा टाकण्यासाठी गेलेले पथक ही हैराण झाले होते. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला असून स्टेट बँकेचे अधिकारी नोटा मोजत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील गुटखा व्यवसायिक जगत गुप्ता याच्या घरावर CGST पथकाने छापा टाकला होता. त्याचा व्हिडिओ समोर आला असून सीजीएसटी आणि स्टेट बँकेचे अधिकारी अनेक यंत्रांसह नोटा मोजत आहेत. तर आजूबाजूला नोटांचे बंडले पडलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील पोलीस स्टेशन सुमेरपूर परिसरात गुटखा व्यवसायिक जगत गुप्ता राहत आहे. त्याने आपल्या घरात गुटख्याचा कारखाना सुरू होता. तेथे तो दयाल पान मसाला बनवत होता. याची माहिती CGST पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे CGST पथकाने पान मसाला व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात त्यांनी 18 तास चौकशी केली. आणि 18 तासांच्या चौकशीनंतर 6 कोटी 31 लाख 11 हजार 800 रुपये जप्त केले आहेत. तर CGST टीमने पान मसाला कारखान्यातून 80 लाख रुपयांचा मालही जप्त केला आहे.
हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर शहरातील जुनी गल्ला मंडी (पोलीस स्टेशनच्या मागे) येथील रहिवासी जगत गुप्ता हा पूर्वी गल्ला व्यवसाय करायचा. या व्यवसायात तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. आपल्या दोन मित्रांना भागीदार करून त्याने २००१ मध्ये आपल्या घरात गुटख्याचा कारखाना सुरू केला. त्याने सुरुवातीला चंद्रमोहन ब्रँडची नोंदणी केली होती. त्याचा हा गुटखा काही वेळातच बुंदेलखंडच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध झाला. या व्यवसायाने त्यांचे नशीब चमकले. सीजीएसटी पथकाच्या छाप्यात गुटखा व्यावसायिक आणि त्याचा खरा भाऊ यांच्या ठाण्यावरून करचुकवेगिरीचे मोठे प्रकरण हाती आले. त्यानंतर CGST आयुक्त सोमेश तिवारी यांनी सांगितले की, 6.31 कोटींहून अधिक रोकड प्राप्त झाली आहे. जगत गुप्ता यांच्या घराव्यतिरिक्त रामौतर गुप्ता, गुटखा व्यावसायिकाचे नातेवाईक सहदेव गुप्ता, तसेच कानपूरच्या बिरहाणा रोड येथील त्यांच्या फर्मचे कॉन्स्टेबल कीर्ती शंकर शुक्ला यांच्या कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. यापूर्वी 2011 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीनिवासन यांनी गुटखा कारखान्यावरही छापा टाकला होता.
कारखाना सील
2011 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीनिवासन यांनी गुटखा कारखान्यावरही छापा टाकला होता. त्यावेळी बेकायदेशीर व्यवसाय आणि करचुकवेगिरीसाठी कारखाना सील केला होता. त्यावेळी दोन ठिकाणी मशिन बसवून गुटख्याचा धंदा सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. या कारवाईनंतर अनेक महिने कारखाना बंद होता. या छाप्यात राकेश गुप्ताविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला होता. मात्र श्रीनिवासन यांच्या बदलीनंतर जगत गुप्ता यांनी दोन्ही भागीदारांना व्यवसायापासून वेगळे केले. 2013 मध्ये “सेवक” नावाची नोंदणी करून दयाल ब्रँड नावाने स्वत: व्यवसाय सुरू केला. या ब्रँडचा गुटखा बुंदेलखंड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या बाजारपेठेत चांगला विकला जात आहे.