अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) भरुच येथील एका कोव्हिड रुग्णालयाला (Covid-19 Care Centre) भीषण आग (Fire) लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. सध्या ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. (Gujarat Bharuch Patel Welfare Hospital COVID-19 care center Fire)
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोव्हिड सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने आग लागली. रात्री 12 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
“According to primary information, probably 12 people have been killed in the incident of fire at Patel Welfare Hospital’s dedicated COVID-19 care centre at 12:30 pm in Bharuch,” says police pic.twitter.com/4Y5IUg0XYB
— ANI (@ANI) April 30, 2021
शॉटसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
प्राथमिक माहितीनुसार, शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच या आगीत जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जखमींवर उपचार सुरु
दरम्यान सध्या अग्निशमन दलाचे जवान, पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मात्र ही घटना नेमकी कधी घडली, आग कशी लागली, याची अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सद्यस्थितीत या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना सिविल, सेवाश्रम, जंबूसर अल मेहमूद रुग्णालयांसह इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Gujarat Bharuch Patel Welfare Hospital COVID-19 care center Fire)
संबंधित बातम्या :
आगीच्या घटना वारंवार कशा घडतात ? मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर खडेबोल
Thane Hospital Fire: मुंब्य्रातील रुग्णालयात आग; ICU वॉर्डमधील चार रुग्णांचा दुर्दैवी अंत