पृथ्वीचा स्वर्ग असलेल्या काश्मिरातील बर्फाची चादर गायब ? गुलमर्गमध्ये यंदा बर्फवृष्टी झालीच नाही

| Updated on: Jan 17, 2024 | 7:23 PM

काश्मिरात यंदा जानेवारी सुरु झाला तर गुलमर्ग आणि इतर परिसरात बर्फाची चादर पसललेली नसल्याने पर्यटकांचा उत्साह मावळला आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमातील हिमवर्षाव कधी होणार याची पर्यटक वाट पाहात आहेत. ग्लोबल वार्मिंग आणि अल निनो प्रभावाने हा परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे. पाहुयात काय नेमके कारण ?

पृथ्वीचा स्वर्ग असलेल्या काश्मिरातील बर्फाची चादर गायब ? गुलमर्गमध्ये यंदा बर्फवृष्टी झालीच नाही
gulmarg no snow fall yet
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : जगातील स्वर्ग असे काश्मिरला म्हटले जाते. परंतू या स्वर्गाला नजर लागली आहे. थंडीचा महिना सुरु झाला की जम्मू-काश्मिरातील बर्फाची मजा घेण्यासाठी अनेकांची पावले आपसुकच वळतात. परंतू या नंदनवनात स्नॉ फॉल एन्जॉय करणाऱ्यांना यंदाचा हिवाळा निराजाजनक आहे. कारण यंदा मोसम सुरु होऊन ही या वर्षी  गुलमर्गसह संपूर्ण काश्मीरात बर्फवृष्टी पाहायला मिळालेली नाही. यामुळे पर्यटक तर नाराज झाले आहेत. शिवाय स्थानिक नागरिकही चिंतेत सापडले आहे. या बदललेल्या ऋृतूचक्रामुळे हवामान तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. अल नीनो इफेक्ट आणि ग्लोबल वार्मिंग यास जबाबदार असलल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे काश्मिरातील तापमानात यंदा वाढ झाली असून पाऊसही पडलेला नाही. तर पाहूयात अल नीनो इफेक्टचा ( El Nino Effect ) हा  परिणाम आहे काय…

काय आहे अल नीनो ?

अल नीनो ( El Nino Effect ) ही हवामाना संबंधीत विशेष परिस्थिती आहे. मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान सामान्यहून अधिक झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जाते. जगभरातील हवामानावर त्याचा परिणाम झाला आहे. भारतातील मान्सूनलाही त्याने प्रभावित केले आहे. त्यामुळे देशातील काही भागात पाऊस कमी झाला आहे तर काही ठिकाणी ढगफूटी होऊन पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्यावर्षी उत्तर भारतात शतकातील सर्वाधिक कडक उन्हाळा पाहायला मिळाला. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीने विनाशकारी भूस्खलन झाल्यानंतर हे घडले. या घटना सर्व ग्लोबल वार्मिंगसोबतच अल नीनो प्रभावाच्या असल्याचे म्हटले जात आहे.

याआधी कधी असे झाले होते.?

वातावरणातील बदल आणि अल नीनो प्रभावाने देशातील प्रसिद्ध स्की रिसोर्ट गुलमर्ग यंदा कोरेडे पडले आहे. एका ऑनलाईन पोर्टलच्या बातमीनूसार गुलमर्ग येथे जानेवारीत सर्वसाधारणपणे सरासरी 130.61 सेमी बर्फवृष्टी होते. यावर्षी येथे अजूनपर्यंत बर्फवृष्टी झालेली नाही. काश्मिरात पहिल्यांदा असे घडलले नाही. याआधी देखील साल 2016 आणि 1998 मध्ये देखील गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली नसल्याचे लेह-लडाख हवामान खात्याचे आकडे सांगतात.

का झाला नाही हिमवर्षाव

पश्चिमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातून कमी आर्द्रता आणली, त्यामुळे पाऊस कमी झाला. तसेच एल निनोच्या प्रभावामुळेही बर्फवृष्टी झालेली नसल्याचे एक कारण दिले जात आहे. याशिवाय, एल निनो आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे, पर्यावरणाच्या सर्क्युलर पॅर्टनवर परिणाम झाला आहे, त्यामुळेही हिमवर्षाव यंदा झालेला नसल्याचे म्हटले जात आहे. ग्लोबल वार्मिंग आणि अल निनो प्रभावाने यंदाच्या हवामानाच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. याचा परिणाम केवळ पर्यटनावरच नाही तर येथील स्थानिक जलस्रोतांवरही परिणाम होणार आहे.

काश्मिरातील अर्थव्यवस्थेला झटका

पाण्याच्या टंचाई सोबतच ग्लेशियर आणि बर्फ वितळल्याने सिंधू- गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात पाण्याचा स्रोत तयार होतात. हिमाचलात वितळलेल्या बर्फामुळे अनेक वेड्यावाकड्या धबधब्यात आणि ओढ्यात त्यांचे रुपांतर होते. त्यामुळे जर हिमवर्षाव झाला नाहीच तर धबधबे, ओढे वाहणार नाहीत. त्यामुळे काश्मिर आणि हिमाचलातील सफरचंदाच्या उत्पादनावर  त्याचा होणार आहे. सफरचंदाचं पिक बर्फवृष्टीवरच अवलंबून असते.