Atul Subhash : निकिता सिंघानियासह आई आणि भावाच्या मुसक्या आवळल्या, अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात पोलीसांची मोठी कारवाई

| Updated on: Dec 15, 2024 | 10:53 AM

Atul Subhash Nikita Singhania : AI सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देश हळहळला. समाजातून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांना गुंगारा देणार्‍या निकीता सिंघानियासह तिची आई आणि भावाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Atul Subhash : निकिता सिंघानियासह आई आणि भावाच्या मुसक्या आवळल्या, अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात पोलीसांची मोठी कारवाई
अतुल सुभाष
Follow us on

AI सॉफ्टवेअर इंजीनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात (Atul Subhash Case) सातत्याने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या त्याची पत्नी, सासू आणि मेव्हण्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अतुल यांची पत्नी आणि आरोपी निकिता सिंघानिया (Nikita Singhania Arrest) हिच्यासह तिची आई निशा आणि भाऊ अनुराग यांना पोलिसांनी अटक केली. निकिता हरियाणामधील गुरुग्राम येथे लपली होती. तर तिची आई आणि भाऊ हे प्रयागराज येथे लपलेले होते.

प्रयागराजमधून केली अटक

निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया हे प्रयागराज येथे लपलेले होते. बेंगळुरू पोलिसांनी याविषयीची माहिती मिळाली. त्यांनी दोघांना अटक केली. सोबतच गुरूग्राम येथून निकिताला अटक केली. या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. निकिताचा काका सुशील सिंघानिया हा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा पण शोध घेत आहेत. जौनपूरसह आजूबाजूच्या नातेवाईकांकडे काकाचा शोध घेण्यात येत आहे

हे सुद्धा वाचा

अतुल सुभाषच्या आत्महत्येने खळबळ

अतुल सुभाष या 34 वर्षांच्या अभियंत्याने 9 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील त्याच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने एक तासांहून अधिकचा व्हिडिओ तयार केला होता. त्यात त्याने पाच लोकांच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचा दावा केला होता. यामध्ये त्याची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा, मेव्हणा अनुराग, चुलत सासरा सुशील सिंघानिया आणि कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश रीता कौशिक यांचे नाव आहे. या लोकांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचे त्यांनी सांगीतले. हाच आपल्यासमोरचा अखेरचा पर्याय असल्याचे त्याने निराशाने आणि खेदाने या व्हिडिओत सांगितले. त्यांने 24 पानाची एक सूसाईड नोट सुद्धा लिहिली.

या सूसाईड नोटमध्ये त्याने अनेक गंभीर आरोप केले. आपला पगार 80 हजार रुपये आहे. आपली पत्नी आपल्यासोबत राहत नाही. तिने आपल्याविरोधात खोट्या 9 केसेस दाखल केल्या आहेत. त्यासाठी आपल्याला सातत्याने जौनपूर वाऱ्या कराव्या लागतात. कोर्टाच्या निर्णयानुसार मुलासाठी 40 हजार रुपये पाठवतो. आता ते प्रति महिना 80 हजारांची मागणी करत आहेत. हा सर्व खेळ पैशांसाठी सुरू आहे. मला आत्महत्येसाठी या लोकांना आगतिक केल्याचे अतुल यांनी म्हटले होते.