मुंबई | 25 जुलै 2023 : देशभरात वंदेभारत एक्सप्रेसचा प्रवास सध्या चर्चेत आहे. अनेक राज्यामध्ये वंदेभारत ही भारताची पहिली वहिली सेमी हायस्पीड बुलेट ट्रेन सुरु झाली आहे. एकूण 25 मार्गांवर वंदेभारतची सेवा सुरु झाली आहे. ही ट्रेन तिच्या वेगासाठी जास्त ओळखली जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत घसघशीत बचत होत आहे. या गाडीतील प्रत्येक गोष्टीची सध्या बातमी होत आहे. असाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
वंदेभारत एक्सप्रेसने भारतात सेमी हायस्पीड ट्रेनचे नवे दालन सुरु केले आहे. आतापर्यंत देशातील वेगवान ट्रेन निजामुद्दीन ते आग्रा धावणारी गतिमान एक्सप्रेस ही ट्रेन सर्वात वेगवान ट्रेन समजली जात होती. ही दर ताशी 160 किमी वेगाने धावते. तर नवीन इंजिन लेस वंदेभारत एक्सप्रेस दर ताशी 180 किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेली ट्रेन आहे. रुळांच्या क्षमतेनूसार आणि मार्गानूसार तिचा वेग आता वेगवेगळ्या मार्गांवर निरनिराळा आहे. वंदेभारत एक्सप्रेसने प्रवाशांना सुविधा देत नवीन पर्याय दिला आहे. तरीही काही त्रूटी राहील्याने तिचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
हाच तो वादग्रस्त व्हिडीओ पाहा
चाय के पैकेट पर ‘हलाल सर्टिफाइ़ड’ लिखने पर मचा बवाल, ट्रेन में यात्री का बनाया वीडियो वायरल
यात्री ने कहा- ‘ये हलाल चाय क्या है?…हमारा सावन चल रहा है’#HalalTea #Train #ViralVideo pic.twitter.com/QKlmuuauf4
— News Master-SEN (@SaranNewz) July 23, 2023
सध्या वंदेभारत एक्सप्रेसमध्ये दिल्या जात असलेल्या जेवणावरून अनेक व्हिडीओ समाज माध्यमावरुन प्रसारीत केले जात आहेत. आता वंदेभारतमध्ये ऐन श्रावण महिन्यात दिलेल्या चहाच्या पाकिटावर हलाल सर्टीफिकेशन असे छापल्याने गोंधळ उडाला आहे. याचा जाब प्रवाशांनी वंदेभारतच्या स्टाफला विचारला असता. त्यांची देखील स्पष्टीकरण देता देता त्रेधातिरपिट उडाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे