Vinesh Phogat : दुपारी पक्षप्रवेश रात्री उमेदवारी, विनेश फोगाट निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर

| Updated on: Sep 06, 2024 | 11:43 PM

Vinesh Phogat Julana Haryana Assembly Elections 2024: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून 6 ऑगस्टला रात्री उशिरा पहिली यादी जाहीर केली आहे.

Vinesh Phogat : दुपारी पक्षप्रवेश रात्री उमेदवारी, विनेश फोगाट निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर
rahul gandhi and vinesh phogat
Follow us on

काँग्रेसने आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकासाठी शुक्रवारी 6 ऑगस्टला रात्री उशिराने पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत 31 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेसच्या या यादीत अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तसेच माजी कुस्तीपटू विनेश फोगाट हीलाही उमेदवारी देण्यात आली आहे. विनेशला जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनी आज (6 ऑगस्ट) दुपारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काहीच तासात विनेशला निवडणुकीचं तिकीट मिळालंय. मात्र दुसऱ्या बाजूला बजरंगला उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत बजरंगचं नाव असणार का? याकडेही लक्ष असणार आहे.

विद्यमान आमदार कोण?

जुलाना विधानसभा मतदारसंघातून सध्या जीजेपीचे (Jannayak Janta Party) अमरजीत ढांडा हे विद्यमान आमदार आहेत. जेजेपीने यंदाही ढांडा यांनाच उमेदवारी दिली आहे. तर भाजपने या मतदारसंघातून उमेदवनार जाहीर केलेला नाही. ढांडा यांनी 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या परमिंदर सिंह ढुल यांचा पराभव केला होता. ढांडा याने 61 हजार 942 मतं मिळाली होती. तर परमिंद सिंह याने 37 हजार 749 मतं पडली होती. तर काँग्रेसला तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेसच्या धर्मेंद सिंह ढुल यांना 12 हजार 440 मतदारांनी आपलं मत दिलं होतं. तर 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून आयएनएलडीच्या तिकीटावर परमिंदस सिंह ढुल यांनी काँग्रेसच्या धर्मेंद सिंह यांचा पराभव केला होता. तर बीएसपी आणि भाजपला अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.

काँग्रेसकडून पहिल्या यादीत 30 जणांना संधी

त्याआधी 2009 साली आयएनएलडीच्या परमिंदर सिंह ढुल यांचा विजय झाला होता. तेव्हा काँग्रेसला दुसर्‍या स्थानी समाधान मानावं लागलेलं. तर 2000 आणि 2005 साली काँग्रेसच्या शेर सिंह यांचा विजय झालेला. तेव्हापासून ते 2019 पर्यंत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा विजय झालेला नाही. आता यंदा काँग्रेसने या मतदारसंघातून विनेशला उमेदवारी दिली आहे. आता विनेशसमोर मतदारांची मनं जिंकण्यांचं आव्हान असणार आहे. विनेशला यात तिला किती यश येतं, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

दरम्यान बजरंग पुनियाला शेतकरी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. सुखपाल खैरा हे शेतकरी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. बजरंग पुनिया हीने याआधी देशभरातील शेतकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.