चंदीगड : हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह (Haryana Sports Minister Sandeep Singh) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. संदीप सिंह यांच्या विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. एका महिला प्रशिक्षकीने संदीप सिंह यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप केला आहे. चंदीगडमध्ये Chandigarh) या महिला प्रशिक्षकेने एफआयआर दाखल केला आहे.
या महिलेच्या तक्रारीनंतर संदीप सिंह यांच्या विरोधात एफआयआर धाखल करण्यात आला आहे. कलम 354, 354A, 354B, 342, 506 अंतर्गत संदीप सिंह यांच्याविरोधात तक्रा दाखल करण्यात आली आहे.
तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस आता या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. तशी माहिती चंदीगड पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत क्रीडा खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे असेल. याबाबतची माहिती सिंह यांनी दिली आहे.
विनयभंगासारखे गंभीर आरोप झाल्यानंतर संदीप सिंह यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. हे राजकीय षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. माझ्यावर लावण्यात सगळे आरोप खोटे असल्याचं संदीप सिंह यांनी म्हटलं आहे.
कोणत्याही पुराव्यांशिवाय माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. मला खूप वाईट वाटतं की मी कायम लोकांच्या कल्याणासाठी काम करतो. त्याच्या भल्यासाठी काम करतो. त्या बदल्यात माझ्या विरोधात असे आरोप केले जात आहेत.पण या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही. जेव्हापासून मी हरियाणात क्रिडामंत्रीपद स्वीकारलं आहे. तेव्हापासून या क्षेत्रात चांगलं काम करता यावं यासाठीच मी प्रयत्नशील आहे. चांगली कामं होत आहेत. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असं संदीप सिंह यांनी म्हटलं आहे.
माझ्यावरील आरोप खोटे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.