इनके प्यार की उमर कितनी ? ‘तो’ पाच मुलांचा बाप, ‘ती’ तीन मुलींची आई

| Updated on: Apr 15, 2023 | 4:52 PM

पाच मुलांचा पिता असलेल्या मुकेश नायक याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेवर प्रेम जडले. त्या दोघांच्या संगनमत झाले आणि त्यांनी पळून जाण्याचा प्लॅन केला. संधी साधून त्या दोघांनी आपापल्या घरून पलायन केले.

इनके प्यार की उमर कितनी ? तो पाच मुलांचा बाप, ती तीन मुलींची आई
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

राजस्थान : सीकर शहरातील उद्योग नगरमध्ये एक मोठी घटना घडलीय. हा प्रकार तसा काहीसा वेगळाच म्हणावा लागेल. त्या वयाच्या टप्प्यात फुललेले हे प्रेम सध्या शहरात चर्चेचा विषय झाला आहे. एकमेकांच्या नातेवाईकांनी याबाबत पोलिसात तक्रार केली असली तरी कारवाई कुणावर करावी असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. कारण ते दोघेही सुज्ञ आहेत, सज्ञान आहेत. नव्हे तर यातला नायक हा चक्क पाच मुलाचा पिता आहे आणि ती महिला तीन मुलींची आई आहे.

4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 4 PM | 15 April 2023

पाच मुलांचा पिता असलेल्या मुकेश नायक याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेवर प्रेम जडले. त्या दोघांच्या संगनमत झाले आणि त्यांनी पळून जाण्याचा प्लॅन केला. संधी साधून त्या दोघांनी आपापल्या घरून पलायन केले.

हे सुद्धा वाचा

नायक याला स्वतःची पाच मुले आहेत. तर, त्याच्यासोबत पळून गेलेल्या महिलेला 17,  12आणि पाच वर्षाची अशा तीन मुली आहेत. त्या महिलेने आपल्या मुलींनाही आपल्यासोबत नेले. त्यामुळे त्या महिलेच्या नातेवाईकांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली.

त्या महिलेच्या नातेवाईकांनी नायक याने ती महिला आणि तिच्या तीन मुलींचे अपहरण केल्याची तक्रार उद्योग नगर पोलिसांकडे केली. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली पण नेमकी कारवाई कुणावर करायची असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे त्या तक्रारीवर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.

स्थानिक पोलिसांकडून कार्यवाही करण्यास उशीर होत असल्याने संतप्त नातेवाईकांनी अखेर पोलीस अधीक्षकांना गाठून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबियांना त्रास होत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची भीती या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तसे, या महिलेची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी अशी मागणीही नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे.