तो जेवतो म्यानमारमध्ये आणि झोपतो इंडीयात , नागालँडच्या मंत्र्याचा अनोख्या घराचा व्हीडीओ व्हायरल

| Updated on: Jan 13, 2023 | 3:17 PM

देशांच्या सीमावर्ती भागात सीमारेषांमुळे अनेकदा आपल्याला अनेक मजेशीर गोष्टी दिसत असतात. त्यातलाच हा प्रकार ट्वीटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

तो जेवतो म्यानमारमध्ये आणि झोपतो इंडीयात , नागालँडच्या मंत्र्याचा अनोख्या घराचा व्हीडीओ व्हायरल
temjen-imna-along
Image Credit source: temjen-imna-along
Follow us on

नागालँड : तुम्हाला कोणी एखादा व्यक्ती झोपतो वेगळ्या देशात आणि जेवतो वेगळ्या देशात असे सांगितले तर खरे वाटेल काय ? परंतू हे खरे आहे. नागालँडचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री तेमजेम इमना यांनी हा व्हीडीओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे. देशाच्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीमुळे अशाप्रकारचे चमत्कार घडत असतात. पाहूया काय आहे हा विचित्र प्रकार ते..

हा चमत्कार आपला शेजारी असलेल्या म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशात घडला आहे. ओंगवा गावात कोन्याक नागा जमातीची वस्ती आहे. कोन्याक नागांच्या वस्तीची अर्धी बाजू भारतात तर अर्धी बाजू ब्रह्मदेशात आहे. या जमातीशी असलेल्या मजबूत सांस्कृतिक आणि कौटुंबिक संबंधांमुळे, सरकारने ओंगवा गावातील रहिवाशांना दुहेरी नागरिकत्व दिले आहे. त्यामुळे म्यानमारच्या या एका घरात राहणारे जेवतात म्यानमारमध्ये आणि झोपायला जातात भारतात असे भौगोलिक आश्चर्य घडले आहे.

नागालँडचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री तेमजेम इमना यांनी एका समाजमाध्यमावर शेअर केलेल्या या अनोख्या घराचा व्हीडीओ खूपच मजेशीर आहे.  म्हणजेच या दोन्ही देशांच्या सीमेवर हे घर उभे आहे. आपल्या  व्हीडीओ ट्वीटरखात्यावर उच्चतंत्र शिक्षणमंत्री तेमजेम इमना यांनी शेअर केला आहे. त्यास त्यांनी या घरातील व्यक्ती जेवते म्यानमारमध्ये तर झोपायला भारतातमध्ये जाते अशी मजेशीर कॅप्शनही दिली आहे.