भारताचे माजी गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवणी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या तब्येतीबद्दल आता अपडेट्स समोर आले आहेत. लालकृष्ण आडवाणी यांच्या तब्येतीमध्ये आता हळहूळ सुधारणा होत आहे. 12 डिसेंबर रोजी त्यांना दिल्लीतील अपोल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना नक्की काय होतंय याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर काल ( मंगळवारी) संध्याकाळी हॉस्पिटलतर्फे आडवणी यांच्याबद्दल हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं.
‘ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे 12 डिसेंबरपासून इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. त्यांच्या तब्येतीच्या प्रगतीनुसार त्यांना पुढील 1-2 दिवसांत ICU मधून हलवले जाण्याची शक्यता आहे.’ असे त्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आलं.
दरम्नाय यापूर्वी ऑगस्ट महिन्यात देखील आडवाणी यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तेव्हाही ते न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सूरी यांच्या ऑब्झर्वहेशनखाली होते. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर त्याच्या एक दीड महीना आधीच 26 जून च्या र्तारी 10.30 च्या सुमाास त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातील यूरॉलॉजी विभागत दाखल करण्यात आलं होतं. एम्समध्ये डॉ. अमलेश सेठ यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आलं होतं.
‘भारतरत्न’ने सन्मानित
यंदा 30 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन लालकृष्ण आडवाणी यांना सन्मानित करण्यात आलं होतं. लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 साली कराची ( सध्या पाकिस्तानात) मध्ये झाला होता. गेल्या महिन्यात 8 नोव्हेंबर रोजी त्यांनी त्याचा 98 वा वाढदिवस साजरा केला. 1942 मध्ये ते स्वयंसेवक म्हणून RSS मध्ये सामील झाले. 1986 ते 1990, पुन्हा 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या काळात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
लालकृष्ण अडवाणी हे असे नेते आहेत ज्यांनीा भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून (6 एप्रिल 1980) प्रदीर्घ काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये 1999 ते 2005 पर्यंत भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम केले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते, पण त्या निवडणुकीत पक्षाला विजय मिळाला नाही.