मुंबई : जुलै महिन्याच्या अंतिम टप्प्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात (Rain) पावसाने उघडीप दिल्याने सर्वकाही सुरळीत होईल असे चित्र झाले होते. शिवाय ऑगस्टमध्ये सरासरीएवढाच पाऊस बरसणार असल्याचेही सांगण्यात आले होते. पण दुसऱ्या आठवड्याच चित्र बदलत आहे. राज्यात (The return of rain) पावसाचे पुनरागमन झाले असून पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पण मुसळधार पाऊस बरसणार आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: नदी काठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन (Meteorological Department) हवामान विभागाने केले आहे.कोकणातील रायगड, रत्नागिरी तर मुंबई पुण्यातही जोरदार पाऊस होणार आहे. पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जनजीवन तर विस्कळीत होईलच पण खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
हंगामाच्या सुरवातीपासून घाटमाथ्यावर बरसणाऱ्या पावसामध्ये आताही सातत्या राहणार आहे. घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आणि कोकणात येत्या 5 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागामध्ये तर पावसामध्ये सातत्य सुरुच आहे. यातच हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. धरणामध्ये सरासरीएवढा पाणीसाठा झाला असल्यास त्या ठिकाणच्या नद्यांना पूरस्थितीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Widespread rainfall activity with heavy to very heavy rainfall at a few places with extremely heavy rainfall at isolated places is expected over Konkan and adjoining ghat areas of Madhya Maharashtra during next 5 days pic.twitter.com/JxboipjVeW
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 7, 2022
ऑगस्ट महिन्यात सरासरीएवढा पाऊस पडेल असा अंदाज होता. पण दुसऱ्या आठवड्यातच निसर्गाने लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे. 10 दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे. विदर्भात 10 ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर 10 ऑगस्ट रोजी याच विभागात अतिवृष्टी होणार असल्याचाही अंदाज आहे.
आतापर्यंत झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसानच झाले आहे. पेरणी होताच उगवलेली पिके ही गेल्या महिन्याभरापासून पाण्यात आहेत. आता कुठे उघडीप होण्यास सुरवात झाली होती. मात्र, पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे उत्पादनात घट तर निश्चित आहेच पण आगामी काळात मुसळधार पाऊस झाला तर खरीप हंगामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.