मुंबई : हंगामाच्या सुरवातीपासूनच राज्यात (Monsoon) मान्सूनचा लहरीपणा पाहवयास मिळाला आहे. आतापर्यंत कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात बरसणार पाऊस आता राज्यात सक्रीय झाला आहे. विशेष म्हणजे कोरडेठाक असलेल्या (Marathwada) मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रखडलेल्या शेती कामांना वेग येणार असून पावसामध्ये सातत्य राहिले तर खरिपाच्या पेरण्याही होतील असा विश्वास निर्माण झाला आहे. आगामी 5 दिवसांमध्ये मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उर्वरीत राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिन्याभराच्या कालावधीनंतर का होईना परस्थितीमध्ये बदल होईल का हेच पहावे लागणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठलड्याच्या पहिल्या दिवसापासूनच मान्सूनमध्ये बदल झाला आहे. आतार्यंत पावसामध्ये लहरीपणा होता तर कोकण आणि मुंबई, ठाणे वगळता उर्वरिकत राज्यात पाऊस हा पूर्ण क्षमतेने सक्रीय झाला नव्हता पण आता परस्थिती बदलत आहे. मंगळवारपासून कोकणासह मुंबई आणि ठाणे या परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम असलेले रुपडे आता मान्सून बदलत आहे. याचा फायदा आगामी काळात होणार आहे.
21 June: Active Monsson conditions over state:
Heavy rainfall warning continues for 5 days for Maharashtra as indicated below graphically.
Severe weather warnings are for Konkan including Mumbai Thane and around.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/F0sX0drJjw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 21, 2022
हंगामाच्या सुरवातीला काही प्रमाणात मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, गायब झालेला पाऊस आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून बरसणार आहे. 26 जूनपासून सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बरसणार आहे. सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. जूनच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली तरच खरीप हंगमातील पिके बहरणार आहेत. अन्यथा उत्पादनावर परिणाम होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या लहरीपणामुळे खरिपातील पेरण्या होतात की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत 22 टक्क्यांना पेरणी क्षेत्र हे घटलेले आहे. असे असतानाही पावसाने उघडीप दिल्याने भविष्यातही पेरण्या होतील की नाही अशी स्थिती आहे. हे ,सर्व होताना कृषी विभागाने मात्र, 75 ते 100 मिमी पावासाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन केले होते. आता सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास शेत शिवार फुलेल अशी आशा आहे.