मुंबई : ओडीशाच्या बालासोर जिल्ह्यातील कोरोमंडल ट्रेन अपघातात जवळपास 288 जणांचा मृत्यू झाला आहे. दशकातील सर्वात भीषण अशा रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना रेल्वे आणि रिलीफ फंडातून आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच प्रवाशांनी तिकीट काढताना भारतीय रेल्वेच्या प्रवासी विम्याची निवड केली असल्यास 10 लाखाची आणखी मदत मिळण्याची तरदूत आहे. अशी एकूण 22 लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे.
ओडीशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या तीन ट्रेनच्या विचित्र अपघातांत 288 जणांचे प्राण गेले आहेत. तर 900 हुन अधिक जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान कार्यालयातून मदतनिधीतून 2 लाख रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. रेल्वे मंत्रालयातून 10 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. आधी रेल्वे अपघातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मिळायची आता ती 10 लाख करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की रेल्वेचे तिकीट काढताना ज्यांनी ट्रॅव्हल इंश्युरन्सचा पर्याय निवडला होता. त्यांना विम्याचे दहा लाख रुपये अतिरिक्त मिळतील. परंतू आयआरसीटीसीने तिकीट काढताना दिलेला हा पर्याय ज्यांनी निवडला असेल त्यांनाच ही सुविधा प्राप्त होईल असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. ओडीशा राज्य देखील मृतांच्या वारसदारांना मदत जाहीर करु शकते असे म्हटले जात आहे.
Ex-gratia compensation to the victims of this unfortunate train accident in Odisha;
₹10 Lakh in case of death,
₹2 Lakh towards grievous and ₹50,000 for minor injuries.— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 2, 2023
या भयानक अपघातात जखमींची संख्या 900 च्या आसपास आहे. जखमींसाठी पीएम मदतनिधीतून प्रत्येकी पन्नास हजार दिले जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयातर्फे गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये मिळतील. तसेच ट्रॅव्हल इंश्युरन्सचे प्रवाशांचा मृत्यू झाल्यास दहा लाख आणि आंशिक अपंगत्व आल्यास 7.5 लाख मिळतात. जर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असतील तर 2 लाखापर्यंत उपचार मोफत होतील.
रेल्वे अपघातातील बळींच्या नातलगांना रेल्वे दहा लाखांची मदत करते. तसेच ट्रॅव्हल इंशुरन्सचे तिकीट बुकींग करताना अत्यंत कमी रकमेत पर्याय निवडताच विमा उतरविण्याची सोय असते. केवळ 35 पैशात हा प्रवासी विमा आयआरसीटीसी उपलब्ध करते. त्यामुळे दहा लाखांचा अपघाती मृत्यू विमा मिळतो. परंतू हा विमा उतरविताना तिकीट काढताना नॉमिनीचे नाव लिहीले बंधनकारक आहे. म्हणजे विमा अधिकाऱ्यांना वारसदारांना जलद गतीने मदतीचे पैसे देता येतात.
पीएम मदतनिधीचे 2 लाख , रेल्वे मंत्रालयाचे 10 लाख आणि तिकीट बुकींग करतानाचे 35 पैसे वाल्या इंश्युरन्सचे रक्कम जमेस धरल्यास एकूण 22 लाखाची मदत मिळू शकते. आयआरसीटीसीचा विमा ज्या कंपनीकडे आहे तिच्या कार्यालयात जाऊन त्यासाठी दावा केला जाऊ शकतो. दरम्यान, तामिळनाडूच्या प्रवाशांसाठी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.