चीनच्या हद्दीजवळ लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, 2 जवानांचे मृतदेह मिळाले; मदतकार्य सुरुच…

| Updated on: Oct 21, 2022 | 6:48 PM

अप्पर सियांग जिल्ह्यातील टुटिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे.

चीनच्या हद्दीजवळ लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, 2 जवानांचे मृतदेह मिळाले; मदतकार्य सुरुच...
Follow us on

गुवाहाटीः उत्तराखंडमधील गरुडछत्तीनंतर आता अरुणाचल प्रदेशात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अरुणाचलमधील (Arunachal Pradesh) सियांग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले असून लष्कराकडून तात्कळा मदत पोहचवण्यात आली. मात्र ज्या ठिकाणी अपघात झाला आहे, ते ठिकाण मुख्य रस्त्यापासून खूप लांब असल्याचेही कळविण्यात आले आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर कितीतरी वेळ ते पेटत असल्याचे सांगण्यात येत आले. त्यानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

आज कोसळलेल्या हेलिकॉप्टर अपघातात दोन जवान शहीद (Two soldiers martyred) झाल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.


सध्या बचावकार्य सुरू असून आणखी काही मृतदेह पहाडी परिसरातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. गरुडचट्टी येथे याआधीही हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले आहे. वैमानिकासह सात जणांचा मृत्यू झाला होता.

गुवाहाटीचे संरक्षण पीआरओ म्हणाले की, अप्पर सियांग जिल्ह्यातील टुटिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे.

लष्कराच्या तुटिंग हेडक्वार्टरपासून 25 किमी अंतरावर असलेल्या ‘अ‍ॅडव्हान्स्ड लाइट आर्मी हेलिकॉप्टरचा हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे दोन जवान असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे हेलिकॉप्टर बाहेरच्या राज्यातून येत होते, त्यावेळी हा अपघात झाला आहे. गुवाहाटीच्या संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सीमेपासून अवघ्या 35 किमी अंतरावर असलेल्या अप्पर सियांग जिल्ह्यातील तुटिंग भागाजवळ आज सकाळी 10:40 वाजता ही दुर्घटना घडली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार आणि अप्पर सियांगचे पोलीस अधीक्षक जुम्मर बसर यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे ते ठिकाण मुख्य रस्त्यापासून खूप लांब आहे. त्यामुले बचाव कार्यासाठी अनेक अडथळे ठरत आहेत. ही दुर्घटना घडल्यानंतर भारताचे कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.