Railway News | येथे रेल्वे एकाचवेळी दोन जिल्ह्यात थांबते, पाहा कुठे आहे हे आगळंवेगळं स्टेशन ?

| Updated on: Sep 15, 2023 | 5:08 PM

भारतीय रेल्वेने देशाच्या विकासात फार मोठा हातभार लावला आहे. रेल्वेची अनेक स्थानके प्रवाशांसाठी वरदान ठरली आहेत. काही स्थानके त्यांच्या भौगोलीक स्थानामुळे नेहमीच चर्चेत असतात.

Railway News | येथे रेल्वे एकाचवेळी दोन जिल्ह्यात थांबते, पाहा कुठे आहे हे आगळंवेगळं स्टेशन ?
INDIAN RAILWAY
Image Credit source: socialmedia
Follow us on

उत्तरप्रदेश | 15 सप्टेंबर 2023 : भारतीय रेल्वे हे जगातील चौथे सर्वात मोठे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वेच्या अनेक आगळ्या वेगळ्या रेल्वे स्थानकांबद्दल तुम्ही ऐकले असेल. भारतीय रेल्वेने दररोज दोन कोटीहून प्रवासी प्रवास करीत असतात. स्वातंत्र्यानंतर देशात रेल्वेने प्रचंड प्रगती केली आहे. आपण प्रवास करताना अनेक स्थानकांना पाहात असतो. आज आपण अशा स्थानकाची माहिती घेणार आहोत, जेथे एकच ट्रेन चक्क दोन जिल्ह्यांमध्ये थांबते. तुम्हाला कोणत्या राज्यात अशी ट्रेन आहे हे माहिती नसेल तर पाहूयात दोन जिल्ह्यात एकाच वेळी थांबणारी ट्रेन नेमकी कुठे धावते..

हे रेल्वे स्थानक आहे खास

भारतीय रेल्वेत असे अनेक चमत्कार आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील नवापूर रेल्वे स्थानकातील फलाटावर जसा एक बेंच दोन राज्यात विभागला आहे. तसेच एक चमत्कारीक आणखी एक स्टेशन आहे. या स्थानकात थांबणारी ट्रेन एका जिल्ह्यात थांबूच शकत नाही. कारण हे रेल्वे स्थानक दोन जिल्ह्यांमध्ये मोडते. या स्थानकात पहिल्यांदा उतरणाऱ्या प्रवाशांना देखील नंतर याबाबत समजते की आपण अशा वेगळ्या ठिकाणी उतरलो आहोत, जेथे एकाच ट्रेनला दोन जिल्हे लागतात हे तेथील माहिती वाचल्यानंतर कळते.

कंचौसी रेल्वे स्थानक

भारतीय रेल्वेचे हे अनोखे रेल्वे स्थानक उत्तर प्रदेशच्या कानपूर ग्रामीण मध्ये आहे. कानपूर ग्रामीणचे क्षेत्र कानपूर महानगरला लागूनच आहे. येथे दोन नॅशनल हायवे जोडले जातात. येथील कंचौसी रेल्वे स्थानकावर ट्रेन दोन जिल्ह्यांना स्पर्श करते. या कंचौसी स्थानकावर उभ्या रहाणाऱ्या ट्रेनचा अर्धा भाग कानपूर ग्रामीण आणि अर्धा भाग औरैया जिल्ह्यात मोडतो. या स्थानकाचे स्टेशन मास्तर कार्यालय कानपूर ग्रामीणमध्ये आहे. तर स्टेशनचा प्लॅटफॉर्म औरैया जिल्ह्याच्या सीमेत येते.

फरक्का एक्सप्रेसला थांबा

कंचौसी रेल्वे स्थानकावर पूर्वी केवळ पॅसेंजर ट्रेन थांबायची. परंतू आता फरक्का एक्सप्रेसचा थांबाही येथे आहे. या स्थानकाच्या आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामीणासाठी एक्सप्रेसचा हा थांबा वरदानापेक्षा कमी आहे. त्यांचे म्हणणे आहे की या थांब्यामुळे त्यांना खूपच फायदा होत आहे.