शिमला : हिमाचल प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आलीय. काँग्रेस पक्षातून तब्बल 30 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडालीय. काँग्रेसने इतका मोठा निर्णय घेण्यामागे काही महत्त्वाची कारणं असल्याची चर्चा आहे. यापैकी पक्षाविरोधात कामं करणं हे मोठं कारण आहे. त्यामुळे काँग्रेसने तब्बल 30 नेत्यांना घरचा रस्ता दाखवत त्यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. आता हे नेते दुसऱ्या कोणत्या पक्षात सहभागी होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मोठा निर्णय घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षाच्या 30 नेत्यांची हकालपट्टी केल्याने खळबळ उडालीय.
सर्व 30 नेत्यांची पुढच्या 6 वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
‘या’ नेत्यांची करण्यात आली हकालपट्टी
देशात भाजपची सत्ता आल्यापासून अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर भरपूर बदल झाले. अनेकांनी काँग्रेसमधून वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला. गेल्या आठ वर्षात काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या.
विशेष म्हणजे काही ठिकाणी काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये अपयश येत असल्याने पक्षांतर्गत मतभेद उफाळून आल्याचं देखील चित्र दिसलं. काँग्रेसला एक कायमस्वरुपी राष्ट्रीय अध्यक्ष मिळावा यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मोठ्या गटाकडून हालचाली झाल्या. त्यांनी तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपली बाजू मांडली.
या सगळ्या घडामोडींनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बांधकाम सुरु आहे. असं असताना काही ठिकाणी पक्षाविरोधात कामगिरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई देखील केली जात असल्याचं समोर येतंय.