SP Hinduja Death : हिंदुजा गृपचे चेअरमन यांचे निधन, हिंदुजा भावांमध्ये सर्वात मोठे होते एस.पी. हिंदुजा

| Updated on: May 17, 2023 | 9:20 PM

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. एस. पी. हिंदुजा व्यावसायिक होते. ते मुळचे भारतीय असलेले अरबपती होते.

SP Hinduja Death : हिंदुजा गृपचे चेअरमन यांचे निधन, हिंदुजा भावांमध्ये सर्वात मोठे होते एस.पी. हिंदुजा
Follow us on

नवी दिल्ली : हिंदुजा गृपचे चेअरमन (Hinduja Group Chairman) एस. पी. हिंदुजा (S. P. Hinduja ) यांचे निधन झाले. एस. पी. हिंदुजा यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबातील प्रवक्त्याने ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. एस. पी. हिंदुजा व्यावसायिक होते. ते मुळचे भारतीय असलेले अबरपती होते. त्यांनी आपल्या कुटुंबासह भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांमधील संबंध चांगले करण्यासाठी मदत केली.

भारत आणि ब्रिटन यांच्यात मजबूत संबंध

गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाने हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एस. पी. हिंदुजा यांच्या निधनाची घोषणा केली. एस. पी. हिंदूजा हे त्यांचे वडील पी. डी. हिंदुजा यांच्या सिद्धांत आणि मुल्यांवर चालणारे दूरदर्शी नेता होते. त्यांनी ब्रिटन आणि भारत यांच्यात संबंध मजबूत केले.

हे सुद्धा वाचा

अशोक लेलँड सारखं ब्रँड

हिंदुजा हा खूप जुना गृप आहे. याची स्थापना १९१४ मध्ये श्रीचंद परमानंद यांनी केली. श्रीचंद परमानंद यांना चार मुलं होते. जगातील ३८ देशांत या गृपचा कारभार पसरला आहे. हिंदुजा गृपमध्ये सुमारे दीड लाख कर्मचारी काम करतात.

हिंदुजा गृप ट्रक बनवतो. याशिवाय बेकिंग पावडर, मीडिया, हेल्थ आणि केमिकल सेक्टरमध्ये काम करतो. ऑटो कंपनी अशोक लेलँड आणि इंडसइंडसारखे ब्रँड हिंदुजा गृपचे आहेत.एस. पी. हिंदुजा यांनी हिंदुजा गृपची समर्थपणे धुरा सांभाळली.

श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. १७ मे २०२३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मे २०२० मध्ये त्यांचे भाऊ गोपीचंद हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. १९९० पासून युके आणि आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत राहायचे.

कराची आणि सिंध येथे त्यांचे बालपण गेले. मुंबईतील दावर्स कॉलेज आणि आर. डी. नॅशनल कॉलेज येथे यांनी शिक्षण घेतले. मुंबईतील टेक्सटाईल आणि ट्रेडिंग बिझनेसमधून त्यांनी करिअरची सुरुवात केली.