अग्निवीरांना भारतीय सैन्या दलात इतर सैनिकांप्रमाणे शहीद हा दर्जा दिला जात नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर या संदर्भात वाद निर्माण झाला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर ही योजना चांगली आहे त्यातील त्रूटी नक्कीच दूर करु असे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. आता माजी अग्निवीरांना CISF-BSF या निमलष्करी दलाच्या नोकरी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. अग्निवीर योजना ही तरुणांना चार वर्षे सैन्या दलाची नोकरी देणारी योजना आहे. या योजनेत सैनिकांवर कोणताही अन्याय होणार नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
CISF-BSF मध्ये माजी अग्निशमन जवानांसाठी 10 टक्के कॉन्स्टेबल पदे राखीव ठेवली जाणार आहेत. गृह मंत्रालयाने याबाबत आज मोठी घोषणा केली आहे.केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात अग्निवीरच्या भरतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले असून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबलची 10 टक्के पदे माजी अग्निवीर तरुणांसाठी राखीव असणार आहेत. माजी अग्निवीरांना वयोमर्यादेतही सूट दिली जाणार आहे. या निर्णयाचा CISF साठी देखील फायदाच होणार आहे, कारण ती CISF ला प्रशिक्षित, सक्षम आणि तरुणांची गरज असते. यामुळे निम लष्करी सैन्य दलात शिस्त येईल असे सीआयएसएफचे डीजी नीना सिंह यांनी म्हटले आहे. या तरुणांना वयोमर्यादेबरोबरच शारीरिक क्षमता परीक्षेत देखील सवलत दिली जाणार असल्याचे डीजी नीना सिंह यांनी म्हटले आहे.
माजी अग्निवीर जवानांना सीआरपीएफमध्ये भरती करण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निवीरांनी सैन्यात असताना शिस्तबद्ध प्रशिक्षण दिलेले असते. या नव्या निर्णयामुळे आमच्याकडे पहिल्या दिवसापासूनच प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध कर्मचारी असतील, अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला CRPF मध्ये 5 वर्षांच्या वयोमर्यादेची सवलत दिली जाईल असे सीआरपीएफचे डीजी अनीश दयाल सिंह यांनी म्हटले आहे.