नवी दिल्ली : ओडिशाच्या (Odisha) बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी आतापर्यंतचा सर्वात भयंकर रेल्वे अपघात (Railway Accident) झाला. यामध्ये 288 लोकांचा मृत्यू ओढावला. तर जवळपास 1000 रुपयांहून अधिक लोक जखमी झाले. ही दुर्घटना 3 रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्यानंतर झाली. तामिळनाडू ते हावडा जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट आणि एक मालगाडी यांच्यात टक्कर झाली. आता या दुर्घटनेची चौकशी होईल. पण रेल्वेच्या दुर्घटनेनंतर काय कारवाई होते, लोको पायलट (Loco Pilot) जर दोषी असेल तर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात येते का? याविषयीचे नियम काय आहेत.
57 टक्के दुर्घटना स्टाफमुळे
दुर्घटनेत यशवंतपूर सुपरफास्ट रेल्वेच्या तीन जनरल डब्बांना मोठा फटका बसला. कोरोमंडल एक्सप्रेसचे एकूण 13 डब्बे क्षतीग्रस्त झाले आहेत. यामध्ये स्लीपर, एसी आणि जनरल डब्ब्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एका माहिती अधिकारीतील माहितीनुसार, रेल्वेच्या 57 टक्के दुर्घटना कर्मचाऱ्यांमुळे होतात. पण या दुर्घटनांमागे चालकाचीच चूक असते, असे अनेकांना वाटते. काही दुर्घटनांमध्ये त्यांची चूक असेल पण, प्रत्येकवेळी त्यांचीच चूक असते असे मानणे योग्य नाही. खरंच लोको पायलटची चूक असेल तर त्यावर काय कारवाई करण्यात येते?
लोको पायलटची चूक कशी
लोको पायलटकडून फार कमी चुका होतात. कारण लोको पायलट सिग्नलच्या आधारे रेल्वेगाडी चालवतो. जर त्याला ग्रीन सिग्नल मिळाला तर तो ट्रेन चालवितो. पण त्याला लाल सिग्नल मिळाला तर तो ट्रेन थांबवितो. लोको पायलट सिग्नल कधीच सोडत नाही. परंतु, ट्रेन रुळावरुन उतरली तर लोको पायलटला दोषी ठरविण्यात येतो.
अशा झाल्या दुर्घटना
चूक असल्यास काय कारवाई