नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड कहर सुरू आहे. ही लाट आटोक्यात येताच तीन-चार महिन्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका उभा राहणार आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग अधिक होण्याची शक्यता केंद्र सरकारच्या सल्लागारांनी वर्तवली आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मात्र अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही, तर सरकारच्या आवाहनानुसार कोरोना नियमावलीचे पालन करण्याची नितांत गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी नेमकी कितपत घातक आहे? मुलांना कशाप्रकारे विषाणू संसर्ग होऊ शकतो? अशा विविध प्रश्नांवर राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली महत्त्वाची मते नोंदवली आहेत. (How dangerous is the third wave of corona for children, know the opinion of AIIMS expert doctors)
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात, देशात कोरोनाचा प्रतिकार करणाऱ्या तीन लसी सध्याच्या घडीला उपलब्ध आहेत. आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांनाही कोरोना प्रतिबंधक लस टोचली जात आहे. सर्व काही सुरळीत अर्थात निर्धारीत वेळापत्रकानुसार आणि नियोजनानुसार पार पडले तर पुढील काही महिन्यांतच देशातील बहुतांश लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होणार आहे. परंतु एक चिंतेचा विषय म्हणजे 18 वर्षांखालील मुलांचे कोरोना लसीकरण. ही मुले अजूनही कोरोना लसीकरण मोहिमेपासून वंचित आहेत. कारण आपल्या देशात अद्याप लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक निशाण्यावर असणार आहेत. याबाबत दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉ. नीरज निश्छल यांनी आकाशवाणीला मुलाखत दिली. त्यांनी मुलांचे कशाप्रकारे संरक्षण करता येईल, यासंदर्भात उपाय सुचवले.
ज्यावेळी आपल्या देशात कोरोनाची पहिली लाट होती, त्यावेळी अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट पसरली होती. त्या अनुषंगाने वैज्ञानिकांनी विविध शंका उपस्थित केल्या होत्या. आपल्यासाठी सर्वात चांगली बाब ही आहे की धोक्याचा संदेश आपल्याला वेळीच मिळाला आहे. मात्र आपण कोरोना नियमावलीचे पालन करण्यात हयगय करू लागलो. त्यामुळे कोरोनाचे नष्ट होण्याच्या मार्गावर संकट आपण पुन्हा वाढवून घेतले आहे. आपण निष्काळजी वागू लागल्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. विषाणूंच्या दोन लाटांचा सामना केल्यामुळे आता विषाणूचा संसर्ग कसा टाळायचा, याची आपल्याला चांगली कल्पना आली आहे. त्याच अनुभवाच्या आधारे नियम पाळत गेलो तर आपण कोरोनाची तिसरी लाट टाळू शकतो. सरकारकडून लॉकडाऊनच्या घोषणेची वाट न पाहता स्वत:च सावध राहण्याची गरज आहे.
देशात ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली आहे, तसेच कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन वृद्ध मंडळी घरात आहेत. मात्र तरुण मंडळी बाहेर फिरतात. अनेकांना अजून लसीचा पहिला डोसही दिलेला नाही. त्यामुळे हे लोक सध्या विषाणू संसर्गाचे लक्ष्य ठरत आहेत. त्यापाठोपाठ लसीकरण मोहिमेपासून दूर असलेल्या 18 वर्षांखालील वयोगटात संसर्गाचा धोका आहे. जर आपण पुरेशी खबरदारी घेतली तर लहान मुलांमधील संसर्गाचा धोका रोखू शकतो, असे मत डॉ. नीरज निश्छल यांनी नोंदवले आहे.
– उत्तम आरोग्यासाठी विविध प्रकारची औषधे आणि सप्लीमेंट घेणे चांगले नाही. त्याऐवजी प्रोटिन, कॅल्शियम आणि मिनरल्ससाठी आरोग्यदायी पदार्थ खाल्ले पाहिजेत.
– पोषक तत्त्वे अधिक असलेले पदार्थांचा आहारात समावेश करा.
– कुटुंबात मुलांनाही आपल्याबरोबर व्यस्त ठेवा.
– आजकाल मुलांना शाळा किंवा बाहेर जाण्याची गरज नाही. त्यामुळे मुले गेम किंवा टीव्ही पाहतात. त्यांची दिनचर्या बनवा.
– थोडा शारिरीक व्यायाम करून घ्या. जंक फूड, फास्ट फूड आणि सॉफ्ट ड्रिंकचे सेवन करू नका. प्रोटीनवाला आहार अधिक घ्या. (How dangerous is the third wave of corona for children, know the opinion of AIIMS expert doctors)
लाँग टूर, डोंगर दऱ्यातून प्रवास, लेह लडाखला जाणाऱ्या Royal Enfield प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी#RoyalEnfield https://t.co/z53cGXh9CP
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2021
इतर बातम्या
तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोना संसर्ग! 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण
IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान