तुरुंगात केजरीवाल यांचे वजन वाढले की झाले कमी, AAP च्या आरोपानंतर हेल्थ बुलेटिनमध्ये काय माहिती

| Updated on: Apr 11, 2024 | 10:32 AM

Arvind Kejriwal Tihar Jail : काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने तुरुंगात केजरीवाल यांची तब्येत बिघडल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांचे वजन 4.5 किलोने घटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तुरुंगाने त्यांचे हेल्थ बुलेटिन जाहीर केले आहे.

तुरुंगात केजरीवाल यांचे वजन वाढले की झाले कमी, AAP च्या आरोपानंतर हेल्थ बुलेटिनमध्ये काय माहिती
अरविंद केजरीवाल यांची तब्येत कशी
Follow us on

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणात अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुक्काम ठोकावा लागला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांची 10 दिवस त्यांची चौकशी केली. न्यायालयाने 1 एप्रिल रोजी केजरीवाल यांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. तिहारमध्ये त्यांना दहा दिवस झाले आहेत. तर अटक होऊन 21 दिवस उलटले आहेत. त्यानंतर आम आदमी पक्षाने केजरीवाल यांची तब्येत घसरल्याचा आणि त्यांचे वजन 4.5 किलोने घटल्याचा आरोप केला होता. या आरोपाला तिहार तुरुंग प्रशासनाने हेल्थ बुलेटिनद्वारे उत्तर दिले आहे.

केजरीवाल यांच्या आरोग्याविषयी चिंता

AAP ने तुरुंगात अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडल्याचा आरोप केला होता. त्यांचे वजन 4.5 किलोने कमी झाल्याचे पण म्हटले होते. दिल्लीची मंक्षी आतिशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आरोप केले होते. त्यानुसार, केजरीवाल यांना मधुमेह आहे. तरीही ते तुरुंगातून राज्याचा गाडा हाकत आहेत. तुरुंगात गेल्यापासून त्यांच्या वजनात मोठी घट आली आहे. हा चिंतेचा विषय आहे. भाजपने त्यांना तुरुंगात टाकून त्यांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झाले तर देशच नाही तर देव सुद्धा भाजपला माफ करणार नाही, असा निशाणा आतिशीने साधला होता. त्यावर तुरुंग प्रशासनाने हेल्थ बुलेटिन जाहीर केले आहे.

हे सुद्धा वाचा

कमी नाही, वजन तर वाढले

या राजकीय तिरंदाजीत तिहार तुरुंगाने अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याचे वार्तापत्र, हेल्थ बुलेटिनच जाहीर केले. त्यानुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वजन एक किलोने वाढले आहे. पूर्वी त्यांचे वजन 65 किलो होते तर आता ते वाढून 66 किलो इतके झाले आहे. अर्थात हेल्थ बुलेटिननुसार, त्यांची शुगर लेव्हल, रक्तातील शर्करा वाढल्याचे समोर येत आहे. केजरीवाल यांची फास्टिंग शुगर लेव्हल 160 इतकी आहे. 1 एप्रिल रोजी केजरीवाल यांना तुरुंगात आणण्यात आले. त्यावेळी त्यांची रक्तातील शर्करा 139 इतकी होती. 2 एप्रिल रोजी शुगर लेव्हल 182 पर्यंत पोहचली. नंतर ती 140 वर आली. आता त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

जेल क्रमांक 2 मध्ये केजरीवाल

अरविंद केजरीवाल हे तिहारमधील जेल क्रमांक 2 मध्ये आहेत. जेल क्रमांक 2 मधील 14 बाय 8 फुटाच्या सेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांची रक्त्तातील शर्करा योग्य प्रमाणात असावी यासाठी त्यांना औषधं देण्यात येत आहे. त्यांच्या शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्र आणि एक पथक लक्ष ठेऊन आहे.